Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सांगलीच्या म्हैसाळ गावावर शोककळा, वीजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू

Electric shock, Three Members died : विजेचा शाँक लागून तीन जणांचा जागीच अंत झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला. सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावातील ही धक्कादायक व मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ गावातील तीन युवकांचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. प्रदीप श्रीकृष्ण वनमोरे वय (35),पारसनाथ वनमोरे वय (40),शाहीराज पारसनाथ वनमोरे वय (12) अशी मृतांची नावे आहेत. तर हेमंत वनमोरे (वय 15)हा युवक जखमी झालेला असून त्यावर उपचार सुरू आहेत.

Accident News

नेमकी कशी घडली घटना

म्हैसाळ गावात वनमोरे कुटुंबीयांची शेती आहे. आपल्या शेतात दैनंदिन कामासाठी वनमोरे कुटुंबातील सदस्य दररोज ये-जा करत असतात. आज सकाळी शेतात पाणी मारण्यासाठी पारसनाथ वनमोरे हे गेले होते. वेळी वीजेची वायर तुटून शेतात पडलेला होता. शेतातून जात असताना त्यांचा पाय या तारेवर पडला अन् ते जागीच कोसळले.

त्याचवेळी शेतात अन्य ठिकाणी काम करत असलेला त्यांचा मुलगा शाहीराज वनमोरे हा वडिल पारसनाथ यांच्याकडे गेला असता शाहीराजलाही वीजेचा जोरदार धक्का बसला. त्यामध्ये, त्याचाही मृत्यू झाला. तसेच, शेतातून प्रदीप वनमोरे हे घटनास्थळी जात असताना त्यांना देखील शॉक लागून त्यांचा मुत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. एकाच कुटुंबातील तिघांचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

या दुर्घटनेत हेमंत वनमोरे हा तरुण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळतात घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर, पंचनामा करुन सर्व मुतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

महावितरणच्या हलगर्जीपणामुळे जीव गेला

दरम्यान, वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना घडली वनमोरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे, या दुर्घटनेतील जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांकडून होत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+