वांद्यात अनधिकृत बांधकाम पाडताना राडा, ठाकरे गट झाला आक्रमक
वांद्र्यातील भारत नगरमध्ये अनधिकृत बांधकामाबाबत आज SRA चे अधिकारी अँक्शन मोडवर आले. हे बांधकाम पाडण्याच्या मुद्यावरुन सध्या मोठा तणाव निर्माण झाला आहे. एसआरएचे अधिकारी यंत्रसामुग्रीसह वांद्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटाही दाखल झाला आहे. दरम्यान, हे बांधकाम पाडण्याविरोधात ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून आमदार वरुण सरदेसाई, आदीत्य ठाकरे हेही येथे दाखल झाले आहेत.

वरुण सरदेसाई आक्रमक
या कारवाईला वांद्याचे आ. वरुण सरदेसाई यांनी जोरदार विरोध केला. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "एसआरएच्या ऑफीसमध्ये मी दोन दिवासंपूर्वी अख्खा दिवस होतो. हे करु नका, हे मी त्या अधिकाऱ्यांना वारंवार सांगितलं. लोकांच्या रोषाला सामोर जावं लागले. लोकांचा रोष तुम्ही पाहू शकता, लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. ही माझी जबाबदारी आहे. अदानी ग्रुप लोकांना विकत घेऊ शकत नाही. मी थांबलो, तर गर्दी वाढत जाईल, पोलीस कमी पडतील. असं कृपया करु नका. मी कळकळीची विनंती करतो" असं स्थानिक आमदार वरुण सरदेसाई म्हणाले.
कुठलाही करार झाला नाही
सरदेसाई पुढे म्हणाले, "मी मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण फक्त आश्वासन मिळाली. दीडशे-दोनशे पोलीस घेऊन येऊ नका. विकास करण्याआधी लोकांना विचारा. त्यांना विश्वासात घ्या. तोडणाऱ्या 180 घरांसोबत कुठलाही करार झालेला नाही. तुम्ही मानवतेला धरुन हे काम करत नाहीयत, असं मी वारंवार सरकारही सांगितलं आहे," असं वरुण सरदेसाई म्हणाले.












Click it and Unblock the Notifications