अरविंद केजरीवाल मेरीटवर मुख्यमंत्री, त्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवलं गेलं - खा. सुप्रिया सुळे

Supriya Sule on Arvind Kejriwal CM Resignation : अरविंद केजरीवाल यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय केला गेला. झारखंडच्या मुख्यमंत्र्‍यांवर देखील असेच केले गेले. या सर्वांवर ICE म्हणजे इनकम टॅक्स, ईडी, सीबीआय यांच्याकडून आरोप केले जातात. एजन्सीचा गैरवापर केला जात आहे. वेदना देणारे व अस्वस्थ करणारे आहे. अदृश्य शक्तीच्या मनमानीने हा देश चालत नाही. संविधानाने देश चालतो. केजरीवाल हे मेरीटवर मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे संवेदनशिल व्यक्ती म्हणून त्यांनी सीएम पदावरून बाजूला होण्याचा निर्णय घेतलेला असावा, ते जनतेत जाऊन पुन्हा सत्तेत येतील, असे शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या

मोदी सरकार क्रुर व असंवेदनशील

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल मेरीटवर मुख्यमंत्री झालेले आहेत. पंजाबच्या लोकांनी देखील त्यांना साथ दिली. असंवेदनशील व क्रूर हे मोदी सरकार आहे. जो कोणी विरोधात बोलेल त्यावर खोट्या केसेस करून अटक करण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे लोकशाही टिकवणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.

Supriya Sule

नेत्यांना खूश करण्यासाठी असे विधान का?

राहुल गांधी अमेरिकेत गेले. ते देशविरोधी व आरक्षणविरोधी बोलतात, असे व्हाईस प्रेसिडेंट धनगड बोलले. यावर देखील सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, धनखड यांच्याबद्दल बोलणे अयोग्य राहील. परंतु ज्या व्यक्तीने टीका केली ते कॉंग्रेसमध्ये किती वर्ष होते. आज सोईप्रमाणे व पदासाठी व नेत्यांना खुश करण्यासाठी असे विधान करणे योग्य आहे का,

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, नितीन गडकरी यांचे आमचे वैचारिक मतभेद असले तरी तरी त्यांनी त्यांची भूमिका बदलली नाही. सत्तेसाठी तडजोड कधीही त्यांनी केलेली नाही. महाविकास आघाडी हे फेक नरेटिव्ह हाणून पाडा असे जेपी नड्डा असे म्हणतात. मुळात भाजपकडे कोणताही अजेंडा उरलेला नाही. त्यांच्याकडे काहीही सांगण्यासारखे नाही. त्यामुळे सत्तेसाठी हे माध्यम आहे. पण अडीच वर्ष ट्रिपल इंजिन सरकार आल्यानंतर त्यांनी भ्रष्टाचार वाढले. महागाई वाढली, त्यांना संधी असून देखील काहीही करता येत नाही.

इतक्या दिवसात गृहमंत्र्यांनी सोडलं असतं का?

राजेश टोपे व रोहित पवार यांनी जरांगे यांना आंदोलनाला बसवले, असा आरोप भुजबळ यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भुजबळ हे मोठे नेते आहेत. ते काय बोलले त्यांनी काय आरोप केले. त्यावर बोलणे उचित ठरेल. पण जर खरच टोपे यांनी असे काही केले असते तर गृहमंत्र्यांनी त्यांना सोडले असते का, भुजबळ तर सत्तेत आहेत ना?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+