Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sunetra Pawar News सुनेत्रा पवार-अमित शहांच्या भेटीची 'ही' आहेत 4 कारणं, फडणवीस-शहा भेटीचे कारण वाचा

Sunetra Pawar to Meet Amit Shah political Meaning : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली सुरू असून, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी होणारी भेट हा राजकीय चर्चेचा विषय असून अलीकडेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत गौप्यस्फोट आणि चर्चा झाली अशातच आता महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अमित शहांशी या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत.

Sunetra Pawar

१. सुनेत्रा पवार-अमित शहा भेट: राजकीय अर्थ आणि विश्लेषण

असे सांगितले जात आहे की, सुनेत्रा पवार यांची दिल्लीवारी केवळ सदिच्छा भेट नसून, त्यामागे आगामी निवडणुका आणि महायुतीमधील 'बार्गेनिंग पॉवर' वाढवण्याचे गणित असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

२. राष्ट्रवादीची दिल्लीतील पकड

उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची दिल्लीतील भेटीचा अर्थ म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता केंद्रातील भाजप नेतृत्वाशी थेट संवाद साधू इच्छित आहे. यामुळे महायुतीमध्ये राष्ट्रवादीची जागा अधिक भक्कम होण्यास मदत होईल.

३. बारामती आणि आगामी निवडणुकांचे नियोजन

बारामतीमधील राजकीय समीकरणे, राष्ट्रवादी विलिनीकरणावर झाेलेले मत-मतांतर आणि आगामी पक्षीय वाटचाल याठी ही भेट महत्त्वाची आहे. जागावाटपाच्या सूत्रामध्ये स्वतःचे पारडे जड ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांची भेट महत्वाची असल्याचे मानले जात आहे.

४. निधी आणि विकासकामांचा पाठपुरावा

महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पांसाठी केंद्राकडून मिळणारा निधी आणि रखडलेल्या योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री स्तरावर हा संवाद महत्त्वाचा ठरतो म्हणून या सर्व पार्श्वभुमीवर भेट घेत असल्याचे असे आडाखे समोर येत आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या भेटीत नेमके काय झाले?

देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच अमित शहा यांची भेट घेतली. या हाय-प्रोफाईल बैठकीत महाराष्ट्राच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारे काही मुद्दे चर्चेत आहेत.

जागावाटपाचा तिढा: महायुतीमधील तीनही पक्षांमध्ये (भाजप, शिवसेना-शिंदे, राष्ट्रवादी-अजित पवार) जागावाटपावरून कोणताही संघर्ष होऊ नये, यासाठी भाजपचे 'हायकमांड' काय भूमिका घेणार, यावर चर्चा झाली.

मंत्रिमंडळ फेरबदल: महाराष्ट्रातील मंत्रिमंडळात काही नवीन चेहऱ्यांना संधी देणे किंवा फेरबदल करण्याबाबत केंद्राकडून हिरवा कंदील मिळवण्याचा फडणवीसांचा प्रयत्न होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+