Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात." उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात." तसेच या विकृतीमध्ये जर मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर तेही विकृत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान बदलापूर घटनेवरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे म्हणाले की, "राज्यातील कानाकोपऱ्यात असं वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा 24 आॅगस्ट रोजी करत आहोत".

Uddhav Thackeray on Eknath Shinde

"बहीण सुरक्षित असेल तर..."

ठाकरे म्हणाले की, "कोरोना व्हारसशी लढलो, तसा हा विकृतीचा व्हायरस आहे,. राज्यातील कानाकोपऱ्यात वातावरण झालं पाहिजे की कुणीही असं दुष्कृत्य करायला धजावला नाही पाहिजे. कोणी केलं तर त्याला ताबडतोब शिक्षा होते, ही भीती त्याच्या मनात व्हावी म्हणून हा बंद करत आहोत. त्यामागे राजकारण नाहीये. सुरक्षित बहीण ही प्राथमिकता असली पाहिजे. बहीण सुरक्षित असेल तर लाडकी बहीण योजना आणता येतात", असे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

तर मुख्यमंत्रीही विकृत

ठाणे जिल्ह्यातच बदलापूर येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हे दुष्कृत्य मान्य आहे का? राज्यभरात या घटनेचा निषेध होत असताना मुख्यमंत्री शिंदे कुठे होते? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. तसेच या विकृतीमध्ये जर मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर तेही विकृत आहेत. या गुन्ह्यातील आरोपांनी जे पाठीशी घालत आहेत, तेही विकृत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

24ऑगस्टच्या बंदमध्ये सामील व्हा

24 ऑगस्टला जातपात धर्म, पक्ष भेद बाजूला ठेवून बंदमध्ये या. मुलगी ही मुलगी असते. आपल्या राज्यात मुलींना शिक्षणाची मोफत शिक्षणाची सोय आहे. पण ती सुरक्षित नसेल तर उपयोग काय. जी मुलगी कडेवर जाण्याच्या वयातील आहे, तिच्यावर अत्याचार होत असेल तर ती लढणार कसे. ही मुलं घाबरून गप्प बसतात. पण त्यांच्यावरील अत्याचारावर पोलीस ढिम्म बसत असतील तर करायचे काय. परवापासून जे सुरू आहे. तो जनतेचा उद्वेग आहे. हा संप राजकीय नाही. तर माता भगिनींच्या रक्षणासाठी आपण जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी बंद आहे. स्वतहून पुढे या आणि बंद करा", असेही आवाहन उद्धव ठाकरेंनी केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+