महायुतीत जागा वाटपावरुन मारामा-या होतील, खुनखराबा होऊ नये हीच आमची अपेक्षा,संजय राऊतांची खोचक टीका
मुंबई : महायुतीतील तीनही पक्षात एकवाक्यता नाही, एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला थोबाड फोडण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण किती टोकाला गेलं आहे. महायुतीत आता प्रकरण आता मारामारीपर्यंत पोहचले आहे. उद्या जागा वाटपावरुन महायुतीतील तीनही पक्षांत मारामा-या होतील. खुनखराबा होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असल्याची खोचक टीका शिवसेना (उबाठा) नेते संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की मुंबई-गोवा महामार्ग स्वर्गात जाणारा रस्ता ज्याला म्हटले जाते पण ठेकेदारांकडून कशी लूट सुरु आहे हे महामार्गांच्या दुरावस्थेवरुन लक्षात येईल. सावर्जनिक बांधकाम, नगरविकास खाते शिंदे गटाच्या एटीएम मशीन बनलेल्या आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. सरकार पैशाच्या मागे लागले आहे. शिंदे गटाच्या नेत्याने ज्या मंत्र्यांच्या बाबती रस्त्याच्या बाबतीत सांगितले ते सत्य तर आहे. पण प्रकरण मारामारी पर्यंत गेलं.

नवाब मलिकांवरील खटले खोटे आहेत हे जाहीर करा
जशी आमच्यावर कारवाई केली तशी नवाब मलिक यांच्यावरही सुडाने कारवाई केली. मलिक देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर सात्यत्याने पुराव्यासह बोलत होते. त्यांनी असे काही खळबळजनक पुरावे मांडले ज्यामुळे फडणवीस यांनी त्यांच्याविरुद्ध ईडी, सीबीआईची कारवाई करायला भाग पाडले.
आज नवाब मलिक सरकामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीसांना माझा प्रश्न आहे की, जेव्हा नवाब मलिक हे विधानसभेत सरकारी बाकावर बसले होते तेव्हा फडवीसांनी नितिमित्ताचा पुळका येऊन अजित पवारांना एक पत्र लिहून मलिक यांचं बसण कसं योग्य नाही, भाजपाच्या त्यांच्याविषयी भावना काय आहेत हे कळवलं होतं. पण फडणवीसांनी अजित दांदांना मलिकांविषयी लिहिलेले पत्र मागे घ्यावे किंवा त्यांनी जाहीर करावे की त्यांच्यावर केलेली कारवाई सुडबुद्धीने केलेली आहे.
मलिकांनी शिंदेच्या दाढीला आग लावली
नवाब मलिकांनी शिंदेंच्या दाढीलाच आग लावली आहे. जे शिंदे मलिकांविरोधात बोलत होते ते त्यांना आता मांडीवर घेऊन बसले आहेत, आता नवाब मलिक हे लाडके मलिक झाले आहेत. देवेंद्र फडणवीस, एकनाथ ढोगीं राष्ट्रभक्त असल्याची टीका राऊत यांनी केली.
फडणवासींना संन्यास घ्यावा लागेल, जरांगे बोलले हे खरे
फडणवीसांना सन्यास घ्यावा लागेल हे जरांगे बोलले हे खरे आहे, दहा वर्षांत आपण खोटे बोलला आहात. त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण पुर्णपणे बिघडवले आहे. महाराष्ट्र बदनाम झाला आहे.












Click it and Unblock the Notifications