संधी असतानाही भुजबळांना 2004 मध्ये मुख्यमंत्री केलं नाही! शरद पवारांनी सांगितलं 'हे' मोठे कारण!
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आजपासून मागील वीस वर्षांपुर्वी अर्थातच २००४ मध्ये स्वतःचा मुख्यमंत्री करण्याची संधी होती. या संधीचे सोने करायला हवे होते असे आत्ताच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी म्हटले होते पण त्यानंतर हा मुद्दा चर्चिला गेला. आता खुद्द शरद पवारांनीच त्याकाळी त्यांच्या पक्षातील दिग्गज नेते छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री का केले नाही याचे उत्तर दिले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री कधीच झाले नाही
राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर जेही उपमुख्यमंत्री झाले ते कुणीही मुख्यमंत्री झाले नाही. त्यात अजित पवार असो की, छगन भुजबळ किंवा आर. आर. पाटील आणि गोपीनाथ मुंडे आतापर्यंतचा हा इतिहास आहे आणि अजित पवारांनी मुख्यमंत्री पदाची इच्छाही जाहीर केली होती पण आज त्यांना किती संधी आहे हा प्रश्न आहे. छगन भुजबळ यांना 2004 मध्ये संधी होती पण त्यांना मुख्यमंत्री केले गेले नाही.

"..म्हणून भुजबळांना मुख्यमंत्री केले नाही"
2004 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, तेव्हा शरद पवारांना संधी असतानाही त्यांनी मुख्यमंत्रिपद काँग्रेसकडे दिले . तेव्हा पक्षात वरिष्ठ म्हणून छगन भुजबळ हे होते. त्यांना मुख्यमंत्री पदाची अधिक संधी होती पण त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले नाही. यावर शरद पवारांनी आपली भुमिका स्पष्ट केली. शरद पवार म्हणाले, "छगन भुजबळांचं नंतरचं राजकारण तुम्ही बघा. त्यांना तुरुंगात जावं लागलं, त्या काळात भुजबळांच्या हातात नेतृत्व दिले असतं, तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती. शरद पवार 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का केला नाही?
2004 मध्ये राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रिपद घेतले नाही'यासंदर्भात शरद पवारांनी आपली भुमिका स्पष्ट केली त्यांनी अजित पवारांना मुख्यमंत्रीपद का दिले नाही यावर त्यांनी "अजित पवारांचा तेव्हा मुद्दाच नव्हता. असे म्हणत विषय संपवला. पुढे ते म्हणाले, आम्ही अधिक मंत्रिपदे घेतली. माझे अनेक तरूण सहकारी मंत्री झाले.
आर. आर. पाटील, अजित पवार, जयंत पाटील हे तरूण पुन्हा कॅबिनेट मंत्री झाले. नव्या नेतृत्वाला बळ देण्यासाठी ते गरजेचे होते. शिवाय, विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले. त्यांचा पक्ष वेगळा असला तरी आम्ही सर्वजण गांधी- नेहरू विचारधारेचे पाइक असल्याने ते अधिक योग्य झाले." ओबीसींनाही सत्तेत स्थान मिळावे, या मताचा असल्यानेच भुजबळांना बळ दिले असेही ते लोकमतला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
लाडकी बहिण योजनेवर शरद पवारांचे भाष्य
महाविकास आघाडीने आधी लाडकी बहिण योजनेला विरोध केला नंतर त्याच योजनेत पैसे वाढवून देत असल्याचे विरोधक म्हणतात या अजित पवारांच्या वक्तव्याला शरद पवार यांनी उत्तर दिले आणि लाडकी बहिण योजनेवर भाष्य केले. ते म्हणाले विरोध या योजनेला नाही. आम्ही आश्वासन दिले तर अंदाजपत्रकात तशी तरतूद करू, असा इतर निधी तिकडे वळवणार नाही. लोकसभेत फटका बसला म्हणून यांना बहीण-भाऊ, शेतकरी आठवले, असा टोलाही त्यांनी लगावला.












Click it and Unblock the Notifications