Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शरद पवारांची मोठे वक्तव्य, म्हणाले - "महाविकास आघाडीचे 225 आमदार निवडून येणार!"

मुंबई - विधानसभा निवडणुकीबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. महाविकास आघाडीच्या 288 पैकी 225 जागा निवडून येतील, असा विश्वास शरद पवार यांनी आज व्यक्त केला. एका अर्थाने आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचेच संकेत त्यांनी दिले आहेत.

माजी आमदार शरद पवारांच्या पक्षात

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये आज लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत मुंबईत आज पक्षप्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार राजेश टोपे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

Sharad Pawar Statement on Maharashtra Assembly Election

आधी 6 आता 31 खासदार

शरद पवार म्हणाले, राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. पाच वर्षांपूर्वी विरोधी गटाचे फक्त ६ लोक निवडून आले होते. लोकांनी मोदीचे सरकार पाहिले आणि हे बदलण्याचा निर्णय घेतला. यावेळी 31 जणांना निवडून दिलं आहे. या 31 पैकी राष्ट्रवादीच्या 10 पैकी 8 जागा निवडून आल्या आहे.

आपले राज्य प्रगत करुया..

शरद पवार म्हणाले, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शरद पवार साहेब म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी त्या सगळ्याना सोबत घेऊ. देशात आपले राज्य प्रगत करूयात. तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या 225 जागा निवडून येणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.

त्या गोष्टी लोकांना आवडत नाही

शरद पवार म्हणाले, निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यरत आहे. महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर राष्ट्रवादी पक्षाला बळ दिलं पाहिजे, असच सगळ्यांना वाटत आहे. आजच्या प्रवेशाचे वैशिष्ट्य आहे. एक उदगीरचे आणि दुसरे देवळालीचे आहेत. या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार लोकांनी निवडून दिला खरा पण दोन्ही विजयी उमेदवारांनी लोकांचा घात केला.

लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत. तुम्ही येताना वेगळ्या नावाने मतं मागता आणि जाता दुसरीकडे हे लोकांना पटत नाही. ज्यांनी जनतेचा घात केला त्या लोकांना धडा शिकवायचा या भावनेनं अपल्याकडे यायचा निर्णय घेतला त्यांचं स्वागत करतो. असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले जयंत पाटील?

जयंत पाटील म्हणाले की, लातूरमध्ये ऑगस्ट महिन्यात मोठा कार्यक्रम होणार आहे उदगीर आणि अहमदपूर मध्ये, देवळाली मतदार संघ येथील सुद्धा नाशिकचे काही लोक आले आहेत. अजित पवार यांच्या सोबत गेलेले काही कार्यकर्ते आज परत येत आहेत नाशिक येथील देवळाली मतदारसंघ काहीही झाले तर जिंकायचा आहे. ही तुतारी आम्ही सुधाकर भालेराव आम्ही तुमच्या हातात देत आहोत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एमबीबीएस म्हणतो महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार. क्राइम वाढतेय, हिट ॲंड रन वाढतेय. महाराष्ट्राचे झालंय काय? देश आपल्याकडून शिकायचा, आता इकडून तिकडून हे कॉपी करत आहेत. महाराष्ट्र स्वाभिमानी माणसांचे आहे. मराठी माणूस स्वाभिमानी आहे, त्यांनी भ्रष्टाचाराला नाकारले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+