कौतुकास्पद..! एकट्या माजलगाव तालुक्याने देशमुख कुटुंबाला दिली ४४ लाखांची लोकवर्गणी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता २५ दिवस झाले आहेत. तरीही या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही मोकाट आहेत. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मिक कराड यांना अटक केली असली तरी, हा तपास बीड जिल्ह्याबाहेर चालवावा, अशी मागणी आता होत आहे. आता सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला तब्बल ४४ लाख १३ हजार ४८८ रुपयांची मदत माजलगाव तालुक्याने जमा करुन दिली आहे. याबाबत आमदार प्रकाश सोळंके यांनी माहिती दिली.

काय म्हणाले आ. सोळंके
माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी गोळा केलेल्या निधीबाबत माहिती दिली. ते म्हणाले, "माजलगाव मतदारसंघाच्यावतीने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना एक मदत म्हणून 44 लाख 13 हजार 488 रुपये जमा करून दिले आहेत. अजून तीन ते चार दिवस लोक निधी गोळा करतील. सर्व निधी एकत्र झाला की, आम्ही तो आणून देणार आहोत.
उद्या घेणार फडणवीसांची भेट
आ. सोळंके पुढे म्हणाले, "काही आरोपींना अजूनही अटक झालेली नाही, हे दुर्दैवी आहे. पोलीस यंत्रणा आणि तपास यंत्रणांचं हे अपयश आहे. उद्या मी मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कानावर देखील हा सगळा वृत्तांत घालणार आहे.
नवीन एसपीबद्दल अपेक्षा
आ. सोळंके म्हणाले, "दोषी पोलीस कर्मचारी आणि अधिकार्यांची जिल्ह्यातून हकालपट्टी झाली पाहिजे, अशी आम्ही मागणी करणार आहोत. निश्चितपणाने नवीन एसपी आल्याने एक शिस्तीचं वातावरण तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यांचा तसा प्रयत्न चालू आहे. एका दिवसामध्ये काही बदल होत नसतो. गेल्या अनेक वर्षांपासून लागलेली कीड आहे. ही कीड काढायची असेल तर काही कालावधी त्यांना द्यावा लागेल.












Click it and Unblock the Notifications