..ती सगळी भाजपची कारस्थानं! फडणवीस राज्यात असेपर्यंत मराठी जणांना सुख-शांतता नाही, कुणी केलं वक्तव्य

मुंबई - महाराष्ट्रात जोपर्यंत देवेंद्र फडणवीस आहेत, तोपर्यंत मराठी माणसाला सुख आणि शांतता लाभणार नाही, अशी बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान काल काही मराठा आंदोलनकांनी मातोश्रीबाहेर आंदोलन करत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, ही सगळी भाजपची कारस्थाने आहेत असे म्हणत त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं.

sanjay raut on devendra fadnvis over maratha reservation movement

संजय राऊत म्हणाले, अजित पवारांना अडचणीत आणण्याचे काम तटकरेंनी केल्याचे सांगत, त्यांनी टीका केली. महिला अत्याचाराच्या मुद्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कोणताही धर्म नसतो, असं वक्तव्य केलं होतं, त्यावर शर्मिला ठाकरेंच्या निवदेनाचे संजय राऊत यांनी कौतूक केलं.

सुनिल तटकरे हा फिरता रंगमंच

संजय राऊत म्हणाले, उदय सामंत यांनी राजकारणात अनेक वेळा बेईमानीचा जिहाद केला असल्याचे राऊत म्हणाले. त्याच्यावर आम्हाला एक कायदा आणावा लागेल असा टोला देखील राऊतांनी सामंतांना लगावला. तसेच यावेळी राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे यांच्यावरही टीका केली.

दिल्लीत विष्णूचे 13 अवतार

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रात नाटक, संगीत, चित्रपट, राजकारण्याला फार मोठी परंपरा आहे. मराठी लोकं मराठी नाटक आणि रंगभूमीवर प्रेमही करतात. त्यामुळे आपले नवे बारामतीचे जे विष्णूदास आहेत. त्यांना विष्णूदास यासाठी म्हणावं लागले, कारण विष्णूचे 13 वे अवतार दिल्लीत आहेत. त्यामुळे ते विष्णूदास असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+