शिवसेना विश्वासघाताने फोडली! तुम्ही शंकराचार्यांना खोटे ठरवणार असाल तर..संजय राऊतांचे मोठे वक्तव्य
मुंबई - उद्धव ठाकरेंबाबत विश्वास घात झाला, उद्धव ठाकरेंचा पक्ष विश्वासघाताने फोडण्यात आला.विश्वासघाताला हिंदूधर्मात स्थान नाही, असे वक्तव्य हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य यांनी केले. शंकराचार्याचे वक्तव्य या जनतेच्याही भावना आहेत. शंकराचार्यांनाही विरोधक खोटे ठरवणार असाल तर मला आश्चर्य वाटणार नाही असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केले आहे.

संजय राऊत आज यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर आपली मते व्यक्त करीत विरोधकांवर टीकास्त्र सोडले.
शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च
संजय राऊत म्हणाले, शंकराचार्य हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत राजकीय भाष्य केले नाही. त्यांनी त्यांचे मन मोकळे केले आहे. शिवसेनेचा विश्वासघाताने तुकडा पाडला हा हिंदूंचा विश्वासघात आहे. शंकराचार्यांचा आशीर्वाद खूप महत्वाचा असतो आणि तो उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
पीएम नरेंद्र मोदींनी नमस्कार केला
संजय राऊत म्हणाले, विरोधक शंकराचार्य यांना खोट ठरवणार असतील तर मला आश्चर्य वाटणार नाही. पण त्यांच्याच पक्षाचे सर्वोच्च नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शंकराचार्यासमोर दोनच दिवसांपुर्वी एका सोहळ्यात वाकून नमस्कार केला. त्यांनी शकांराचार्यांचा आशिर्वाद घेतला. हेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
काही जणांच्या पोटात दुखतेय
संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याबाबत विश्वासघात झाला. हिंदू धर्मात विश्वासातघात, फसवणुकीला थारा नाही. मुख्यमंत्रीपदावरुन विश्वासघाताने त्यांना दूर केले. पक्ष फोडला, असे हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरु शंकराचार्य सांगतात. त्यामुळे काही जणांना त्यांनी हे सांगताच पोटशूळ उठला आहे, शंकराचार्या्च्या वक्तव्यावर टिकाटिप्पणी होत असेल, तर टीका करणाऱ्यांना हिंदुत्व मान्य नाही असा याचा अर्थ होतो.
शंकराचार्यांना खूप महत्व
संजय राऊत म्हणाले की, न्यायालयामध्ये आमचा शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत खटला सुरू आहे. तो चालेल तेवढा चालेल. पण आदरणीय शंकराचार्यांनी आम्हाला आशिर्वाद दिले. आमच्यावरील अन्यायाबाबत खंत व्यक्त केली. ते मातोश्रीवर आले त्यावेळी पक्षप्रमुखांनी रितीरिवाज आणि मोठ्या श्रद्धेने त्यांची पाद्यपुजा करुन आशीर्वाद घेतले आहेत. शंकराचार्य हे हिंदू धर्मात सर्वोच्च आहेत, त्यांचे म्हणणे खूप महत्त्वाचे आहे.
..हा हिंदूंचा विश्वासघात!
संजय राऊत म्हणाले, न्यायालयात घटनाबाह्य सरकार विरोधात खटला सुरु आहे. आदरणीय शंकराचार्यांनी जो आशिर्वाद दिला, अन्यायासंदर्भात जी खंत व्यक्त केली, ती आमच्यासाठी मोठी आहे. शंकराचार्यांनी त्यांचे मन मोकळे केले. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली सेना त्याचे उद्धव ठाकरे नेतृत्व करीत आहेत.त्याच शिवसेनेचा विश्वासघाताने तुकडा पाडला. हा हिंदुंचा विश्वासघात आहे, असे मत शंकराचार्यानी व्यक्त केल्याचे राऊतांनी म्हटले.
जातीच्या संघर्षामुळे महाराष्ट्र अस्वस्थ
संजय राऊत म्हणाले, जातीपातीच्या संघर्षामुळे महाराष्ट्र अस्वस्थ आहे. निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न योग्य नाही. सर्वच राजकीय पक्षांनी हे वातावरण बदलण्यासाठी प्रयत्न करावे. शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे मार्गदर्शन महत्वाचे आहे.












Click it and Unblock the Notifications