"..म्हणून बांग्लादेश, कॅनडातील हिंदुंवर होत आहेत हल्ले! संजय राऊतांनी केला PM मोदींवर 'हा' मोठा आरोप
Sanjay Raut criticizes PM Narendra Modi : इंदिरा गांधी 1971 साली जेव्हा पुर्व पाकिस्तानात हिंदुंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला. सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांग्लादेशाचे आणि हिंदुंचे स्वंरक्षण केले. पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांग्लादेश निर्माण केला. पण पंतप्रदान नरेंद्र मोदी यांना बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचार थांबवता येत नाही असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोपांची सरबत्तीच केली.

हिंदुवरील हल्ल्याला भाजपचे धोरण जबाबदार - संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, अमित शहा आणि एकंदरीत भाजपच्या राजकीय स्वार्थामुळे आणि सुप्रीम कोर्टाने फूस लावली. चंद्रचूड काही घटनात्मक संस्था आणि या देशातील शांतता, सुव्यवस्था भंग पावली. देशातील निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी जी ठिणगी टाकली, त्याचा परिणाम जगातील ज्या -ज्या भागात हिंदु मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्यावर होत आहे. नेपाळस कॅनडात हिंदुंवर हल्ले झाले. बांग्लादेशात हिंदुंची जीवीतहाणी सुरु आहे. पाकिस्तानमध्ये जे होत आहे त्यालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांचे निवडणुका जिंकण्यासाठीचे धोरण जबाबदार आहे.
नरेंद्र मोदींमुळे परदेशातील हिंदुवर परिणाम
संजय राऊत म्हणाले, हिंदुस्तानात सातत्याने दंगे घडवायचे. मुस्लीमांना टार्गेट करणे, प्रार्थनास्थळे खोदण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे त्याचा उलटा परिणाम परदेशातील हिंदुंवर होत आहे. नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारमध्ये ताकद नाही की, बांगलादेशमध्ये जाऊन हिंदुवरील हल्ले थांबवावे. कॅनडात जाऊन हिंदुवरील हल्ले थांबवावे हे मोदी करु शकत नाही.
इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले
संजय राऊत म्हणाले, इंदिरा गांधी 1971 साली जेव्हा पुर्व पाकिस्तानात हिंदुंवर हल्ले होत होते तेव्हा इंदिरा गांधींनी पाकिस्तानवर सरळ हल्ला केला. सैन्य घुसवलं आणि तिकडल्या बांग्लादेशाचे आणि हिंदुंचे स्वंरक्षण केले. पाकिस्तानचे दोन तुकडे करुन बांग्लादेश निर्माण केला.
काश्मीरी पंडित सुरक्षित नाही
संजय राऊत म्हणाले, भारतात काश्मीरी पंडित सुरक्षित नाहीत. मणीपूरमधील हिंदु सुरक्षित नाही आणि तुम्ही हिंदुंच्या नावावर मते मागता. जा बांग्लादेशात आणि हिंदुंना आधार द्यायला हवा. संघाचे प्रमुख नेते हिंदुंच्या सुरक्षेवर इथेच बसून पत्रके काढताहेत त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगा धोरणात्मक निर्णय घ्या बांग्लादेशसंदर्भात...
हिंदुंना भाजपकडून मोठा धोका - राऊतांचा दावा
संजय राऊत म्हणाले, मी म्हणतो की, या हिंदुंना सर्वात मोठा धोका कुणापासून आहे तर तो भाजपपासून आहे. गोध्रा कुणी केलं. साबरमती एक्स्प्रेसला आग कुणी लावली अशी अनेक प्रकरणे मला सांगता येईल. कुणी काय आणि कशासाठी केले आणि त्याचे परिणाम आज देश भोगत आहे. या देशातील धार्मिक एकता आणि संविधान संपले आहे. या देशातील लोकशाही संपली आहे आणि या देशात बटेंगे तो कटेंगे एक है तो सेफ है या घोषणांमुळे तरुणांची माथी भडकवली गेली त्यातून देशात दंगलीचा माहोल निर्माण केला आहे.
संजय राऊत म्हणाले, बांगलादेशातील स्थिती चिंताजनक आहे. लाखो भारतीय बांगलादेशात राहतात त्यांना असुरक्षित करण्यामागे नरेंद्र मोदी यांचे धोरण कारणीभुत आहे.












Click it and Unblock the Notifications