फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणामुळे भाजपला लोकसभेत फटका,आता तरी हे राजकारण थांबवा - संजय राऊत
मुंबई : "देवेंद्र फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणामुळे भाजपला लोकसभेत फटका बसला असून आता तरी त्यांनी हे राजकारण थांबवावे असा सल्ला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला. ते आज मुंबईत माध्यमांशी वार्तालाप करीत होते.
काय म्हणाले संजय राऊत?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले, "कोण मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, हे सर्वांना माहीत आहे. उद्धव ठाकरेंनी काय आरोप केले? त्यांनी लोकसभेची निवडणूक हरले हेच सांगितले. ठाकरेंनी काय आरोप केले त्यांनी कोणतेही आरोप केलेच नाहीत.

कुणाचं मानसिक संतुलन ढळलं कळेलच
संजय राऊत म्हणाले, हे लोक महाराष्ट्रात भ्रष्टाचार करत आहेत हे त्यांनी सांगितलं. ते लोकसभेची निवडणूक हरले याला आरोप म्हणतात का? आरोप काय असतो मला सांगा, मानसिक संतुलनाची गोष्ट काय आहे हे विधानसभेच्या निवडणुकीनंतर सर्वांना कळेलच.
#WATCH | Mumbai: On the statement of Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis, Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "Everyone knows who is mentally unstable. What allegation did Uddhav Thackeray make? These people are doing corruption in Maharashtra, these people have… https://t.co/QF3THsExZ1 pic.twitter.com/mi6eb01Z4Z
— ANI (@ANI) August 4, 2024
...म्हणून त्यांना लोकसभेला फटका
संजय राऊत म्हणाले, फडणवीसांच्या घाणेरड्या राजकारणामुळे भाजपला लोकसभेत फटका बसला. त्यांनी त्यांचे हे राजकारण आता थांबवले पाहिजे. भारतीय जनता पक्षाला काही काम नाही. तुरुंगातील गुंडांना त्यांचे प्रवक्ते बनवून आमच्यावर आरोप करायला लावत आहे. फडणवीस यांनी अशा प्रकारचे राजकारण थांबवावे. कारण या घाणेरड्या राजकारणाचा भाजपाला लोकसभेमध्ये फटका बसला आहे.
ते महाशय 288 जागा लढवणार..!
संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीवर टोला लगावला. ''ते महाशय स्वतंत्रपणे 288 जागा लढणार आहेत. त्यामुळे राजकारणात देवाण-घेवाण चालूच राहते. स्वतंत्र लढणार या बदल्यात एकनाथ शिंदेंनी काहीतरी दिले. ही देवाण-घेवाणची चर्चा बंद दारात होत असते.
महाराष्ट्राच्या हितासाठी, सामाजिक कार्यासाठी कोणी भेटले, असा काही इतिहास नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी ते अमित शहा यांना भेटले. विधानसभा निवडणुकीच्या आधी ते मुख्यमंत्र्यांना भेटले. महाराष्ट्रातल्या शत्रूंशी हात मिळवणी करणार असतील, तर इतिहास माफ करणार नाही'.
लाडक्या उद्योगपतींच्या घशात मुंबई घालू नये
संजय राऊत म्हणाले, धारावी हा मुंबईसाठी महत्वाचं प्रकल्प आहे. धारावीतील सर्व जातीधर्माच्या लोकांना 500 फुटांची घरं मिळावी, या पुनर्वसन प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही. पण या प्रकल्पासंदर्भात आमची भुमिका धारावीच्या लोकांच्या कल्याणाची आहे, त्यामुळे सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेने मोर्चाही काढला. परंतु हा प्रकल्प चुकीच्या लोकांच्या हातात जावू नये. या प्रकल्पामुळे लाडक्या उद्योगपतींच्या घशात मुंबई घालू नये, अशीच आमची भुमिका आहे.
-
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन! -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
Todays Horoscope marathi : आज या राशींचे नशीब चमकणार! पाहा सोमवार 9 मार्चचे तुमचे राशीभविष्य









Click it and Unblock the Notifications