Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाराष्ट्राचा भाजपचा एक मंत्री पाकिस्तानी क्रिकेटरच्या हाताखाली काम करतोय! संजय राऊतांनी धु-धु धुतलं

Sanjay Raut : "महाराष्ट्रातील भाजपचे एक मंत्री पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या हाताखाली काम करतात, हेच जर भाजपचे नसते तर हिंदुत्व धोक्यात आहे असे म्हणत छाती बडवली असती" असे म्हणत संजय राऊत यांनी भाजपला कैचीत पकडले.

संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप तसेच जय शहा, आशिष शेलार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, धीरेंद्र शास्त्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सेनेवर जोरदार प्रहार केला.

Sanjay Raut criticizes BJP minister Ashish shelar

..तर भाजपने छाती बडवली असती

पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोहसीन नकवी यांच्या नैतृत्वाखाली भाजपचे एक मंत्री हातात हात घालून काम करत आहेत. ते जर दुसरे कुणी असते तर हिंदुत्व, राष्ट्रवाद धोक्यात आला असता आणि भाजपने छाती बडवली असती. पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूच्या हाताखाली एक मंत्री काम करतात ते भाजपचे आहे.

Take a Poll

महाराष्ट्राचा एक मंत्री पाकिस्तानी क्रिकेटरच्या हाताखाली काम करतोय

संजय राऊत म्हणाले, एकीकडे हिंदु मुस्लीम वाद घडवायचा आणि दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या हाताखाली काम करायचे त्या समितीवर राजीव शुक्ला आहेत, जर त्यात भाजपचे कुणी नसते तर राजीव शुक्लांना राजीनामा द्या असे भाजपने म्हटले असते.

जय शहांनी शंभर सेंच्युऱ्या मारल्या

क्रिकेट अध्यक्षासंदर्भात उपहासात्मक पद्धतीने संजय राऊत म्हणाले, जागतिक क्रिकेटचा उद्धार आता भारतालाच करावा लागत आहे. ती जबाबदारी भारतावर सोपवण्यात आली आहे. जय शहा यांनी शंभर सेंच्युऱ्या मारल्या. गावसकरांचे कोचिंग त्यांनी केले.शंभर- दोनशे कॅचेस पकडल्या असे हे महान जय शहा जागतिक क्रिकेटचे अध्यक्ष बनतात. जय शहा भारताचे आहेत अन् दुबईत बसतात, इस्लामी राष्ट्रात बसतात .. असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंची तुलना देवाची केलेली नाही

राऊत म्हणाले, कुणीही कुणाची तुलना केलेली नाही आम्ही माणसे आहोत, देव नाही म्हणून आम्ही संघर्ष करतो. आम्ही माणसं आहोत म्हणून आमच्या पाठीत खंजीर खुपसला. उद्धव ठाकरेंचे नाव हे श्रीकृष्णांच्या असंख्य नावातील एक नाव आहे जे उद्धव आहेत. तेच मी सांगितले मी देवाशी त्यांची तुलना केलेली नाही.

मेंदुतील कचरा साफ करायला हवा..

संजय राऊत म्हणाले, शिंदेंच्या शिवसेनेच्या मेंदुतील कचरा साफ करायला हवे, कानाची शस्त्रक्रिया करायला हवी. ज्यांना बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकर, उद्धव ठाकरे कळले नाही, त्यांना फक्त चमचेगीरी आणि बुटचाटेपणा कळतो अशी टीकाही त्यांनी यावेळी विरोधकांवर केली.

धार्मिक द्वेष भाजपच पसरवतो

सर्वोच्च न्यायालयातील मनसेविरुद्ध दाखल याचिकेवर संजय राऊत म्हणाले, धार्मिक द्वेष हाच जर विषय असेल तर सर्वात आधी भाजपची मान्यता रद्द व्हायला हवी. धार्मिक द्वेष भाजप पसरवत आहे. धीरेंद्र शास्त्री भाजपचे प्रचारक आहेत, ते द्वेष पसरवण्याचे काम करत आहेत आणि मुद्दाम त्यांच्या दर्शनाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जातात. मनसेच्या मुद्यावर वैगेरे नंतर बोलू.

मनसेच्या भुमिकेला पाठींबा

जर महाराष्ट्रात राहायचे असेल तर त्यांना मराठी शिकावे लागेल. हे बाळासाहेब म्हणायचे ते चुकीचे नाही. त्या त्या राज्यात राहायचे तर भाषाही यायला हवी असे म्हणत राऊत यांनी एकप्रकारे मनसेच्या भुमिकेला पाठींबा दिला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+