लेबल काहीही लावले तरी...एकनाथ शिंदे-अजित पवारांचे मालक मोदी अन् शहा- संजय राऊत
Sanjay Raut on Eknath shinde and Ajit Pawar : एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी सद्या लेबल काहीही लावले असेल पण ते मुळात भाजपमध्येच आहेत. त्यांचे मालक हे नरेंद्र मोदी अन् अमित शहा आहेत, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
केंद्राने आरक्षण मुद्द्यात लक्ष्य द्यावे
संजय राऊत म्हणाले की, सद्यस्थितीत राज्यातील विविध ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण अन् आंदोलन करत आहेत. विशेषत: मनोज जरांगे पाटील, धनगर समाजाचे लोक उपोषण करतात, ओबीसी नेते उपोषण करतात. परंतु, शिंदे-फडणवीस सरकार हे तिघांना खेळवत आहे. केंद्राच्या अख्यातारीत हा विषय आहे. शरद पवारांनी जे विधान केले ते योग्यच आहे. त्यामुळे केंद्राने देखील या विषयाकडे लक्ष घातले पाहिजे, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे मांडला पाहिजे.

तामिळनाडूचे आरक्षण टीकलेले आहे. तामिळनाडूने ज्या पद्धतीने आरक्षण बसवले. अगदी तसेच महाराष्ट्र सरकारने हा विषय केंद्राकडे नेला पाहिजे, केंद्राने याकडे लक्ष घातले पाहिजे. पण गृहमंत्री अमित शहा हे मुंबईत येऊन सांगतात की, आंदोलन कसे चिरडायचे हे आम्हाला माहिती आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका.फक्त निवडणुकांकडे लक्ष द्या. परंतु, आमची ती भूमिका नाही. लोकांच्या नेत्यांच्या जीवाशी खेळू नका. महाराष्ट्रात संघर्ष वाढला तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, असे म्हणत राऊतांनी केंद्रासह राज्यावर निशाणा साधला.
सावरकरांनी अनेक बाबतीत विज्ञानविषयक दृष्टीकोन ठेवला. गाय हा उपयुक्त पशू आहे. शेतकऱ्यांना उपयोगी पडते. गाय असेल तर ती बैलांची माता आहे. अशी मत सावरकरांची होती.
पुण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली. यावर देखील राऊतांनी भाष्य केले. ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये आरोपीला गोळ्या झाडल्या गेल्या. त्यानंतर राज्यात फडणवीसांचे सिंघम स्टाईल बॅनर लागले. त्याच बॅनरमधून फडणवीसांनी बाहेर आले पाहिजे, अन् पुण्यातील आरोपींचा देखील एन्काऊंटर फडणवीसांनी केला पाहिजे. आरोपींचे एन्काउंटर करा.
मिंधे हे भाजपमध्येच...!
मिंधे हे भाजपचे आहेत. त्यांनी लेबल हे तात्पुरते काहीही लावले असेल. पण त्यांचे नेते हे मोदी आणि अमित शहा हेच आहेत. फक्त त्यांच्या घरात नांदायचे बाकी आहे. अजित पवारांची देखील हीच परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांचे मालक देखील मोदी शहाच आहेत. विशेष बाब म्हणजे इंदापूरात हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार असल्याची चर्चा आहे. त्यावर राऊत म्हणाले की, चांगली गोष्ट आहे. फक्त मी एवढंच म्हणेन की अजित पवारांची बारामतीत स्थिती फारशी चांगली नाही.












Click it and Unblock the Notifications