महाराष्ट्रात माफियाराज; संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा; मविआ फुटली नसल्याचे दिले स्पष्टीकरण
Sanjay Raut on Devendra Fadanvis : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात की, मी कुणाला सोडणार नाही. पण त्यांनी मुख्य आरोपीला मकोकातून बाहेर ठेवले, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तर यावेळी बोलताना त्यांनी महाविकास आघाडीत बिघाडी झाली का, यावर देखील त्यांनी सविस्तर भाष्य केले.
वाल्मिक कराडला वाचविण्याचे काम सुरू
संजय राऊत पुढे बोलताना म्हणाले की, सरकार वाल्मीक कराड याला वाचवण्याचे काम करत आहेत. तर इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असे मी म्हणालो नाही. काँग्रेसच्या नेत्यांना ऐकण्याची सवय करून घ्यायला हवी, असा टोला ही त्यांनी यावेळी लगावला आहे.
कोणत्या विचारसरणीत पक्ष फोडणे योग्य
संजय राऊत म्हणाले की, कोण कुठे जाणार आणि कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणवीस ठरवू शकत नाहीत. प्रत्येक पक्षाची स्वतःची भूमिका असते. विचारधाराही आहे. भाजपच्या कोणत्या विचारसरणीत पक्ष फोडणे योग्य आहे, हे फडणवीसांनी आधी स्पष्ट करावे.भाजपने आमचा पक्ष फोडला.

मविआ तुटली असे म्हटलो नाही
संजय राऊत म्हणाले की, इंडिया आघाडी किंवा महाविकास आघाडी तुटली असे मी कधीही म्हणालो नाही. केवळ आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या. त्यामुळे कुणालाही मिरच्या लागण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचा अधिकार सर्वांना आहे. शिवसेनेचे मशाल चिन्ह हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे. अद्यापही लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी उपलब्ध होत असते. अशीच सर्व राजकीय पक्षांची धारणा आहे.
बुथ मजबूत करायला हवे
संजय राऊत म्हणाले की, लोकसभेला साडे चार वर्षांचा कालावधी आहे. विधानसभेला पाच वर्ष आहेत. या काळात पक्ष संघटना मजबूत करणे आणि कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले पाहीजे. महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांना आता बुथ स्तरावर काम करण्याची गरज आहे. महाविकास आघाडी विधानसभेसाठी होती. स्थानिक स्वराज संस्थेसाठी ही आघाडी नव्हती. आम्ही भाजपामध्ये असतानाही स्थानिक स्वराज संस्था स्वबळावर लढत होतो.












Click it and Unblock the Notifications