भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला म्हणूनच संतोष देशमुखांचा मर्डर; ठाकरे गटाच्या नेत्याचा गंभीर आरोप

Sanjay Raut : छत्तीसगडमध्ये ज्याप्रमाणे पत्रकाराची हत्या झाली. त्याचप्रमाणे बीड मधील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आहे. या दोन्ही हत्या मी एकाच प्रकारे पाहत असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भ्रष्टाचार विरोधात आवाज उठवल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप राऊत यांनी केला. त्यामुळे भ्रष्ट्राचाराविरोधात बोलणाऱ्याच्या भाजप सरकारमध्ये मारले जात असल्याचा घणाघात त्यांनी केला.

अभिजात दर्जा देणे म्हणजे निवडणुकीचा जुमला?

विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्ही मराठी भाषेचे कसे तारक आहोत, याचे ढोल वाजवले गेले. मात्र मोदी सरकारने मराठी भाषेला अभिजात भोषेचा दर्जा देण्यासंदर्भातला अध्यादेश काढला नाही. तर महाराष्ट्र सरकार देखील त्या संदर्भात पाठपुरावा करताना दिसत नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Sanjay Raut on Chhagan Bhujbal

मोदींनी ट्विटरवर घोषणा केली आणि राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पेढे वाटले. मात्र, प्रत्यक्षात अजूनही अध्यादेश निघाला नसल्याचा आरोप त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा हा केवळ निवडणुकीपूर्ती 'जुमला' होता का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची जी घोषणा मोदी सरकारने केली त्याबाबत नैराश्य दिसत असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

गो-हत्येच्या पैशाचा भाजपकडून वापर

ज्या - ज्या राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. त्या - त्या राज्यांमध्ये गो हत्या होत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. भाजप सरकार असलेल्या राज्यातून सर्वाधिक गो मांस निर्यात केले जात आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्ष पैसा जमा करत आहे. त्यांना मिळालेल्या पक्ष निधीमध्ये मोठ्या प्रमाणात या पैशांचा देखील समावेश असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. याच पैशातूनच भारतीय जनता पक्ष निवडणुका लढवत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+