Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

RSSचा सर्व्हे! महायुतीला 160 जागा मिळण्याचा अंदाज! एकनाथ शिंदे, अजित पवार, भाजपला किती जागा वाचा!

RSS survey : राज्यात विधानसभा निवडणुकीचा ज्वर चढला असून जिकडे तिकडे राजकीय चर्चांना उधान आले आहे. कोण होणार मुख्यमंत्री अन् कुणाचे सरकार येणार याच्याच चर्चा आहेत,त्यात भर म्हणून भाजपची जन्मदात्री आरएसस अर्थात राष्ट्रीय स्वंयसेवक संघटनेचा एक सर्व्हे आला आहे. या सर्व्हेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला 160 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा आरएसएसचा अंतर्गत सर्व्हे आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार, महायुती या विधानसभा निवडणुकीत थोडीशी बॅकफूटवर आहे असे दिसते मात्र, आरएसएसच्या सर्व्हेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

RSS survey Mahayuti is predicted to get 160 seats

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महायुतीतील घटक पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर महाविकास आघाडीचा फार्मूला ठरला. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. याचदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) अंतर्गत सर्व्हे समोर आला आहे.

RSS survey काय आहे सर्व्हेत?

  • आरएसएसकडून महाराष्ट्रातील 288 जागांचं सर्वेक्षण
  • भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळेल.
  • राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण समजून घेण्यासाठी संघ निवडणुकीपूर्वी गोपनीय पद्धतीने अंतर्गत सर्वेक्षण करतो. त्या सर्वेक्षण अहवालाच्या आधारे RSS संबंधित व्यक्तीने ही गोष्ट सांगितलं.
  • भाजपची निवडणूक रणनीती बनवली जाते आणि लोकसंख्या लक्षात घेऊन उमेदवारांची निवड केली जाते.
  • हे सर्व्हेक्षण ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातील आहे आणि आरएसएसने 288 जागांवर सर्वेक्षण केले आहे.

सर्वेक्षणात कोणाला किती जागा?

आरएसएसच्या सर्वेक्षणानुसार महायुती 160 जागा जिंकू शकते तशी तयारी महायुतीने केली, तर भाजपचा यंदा 90 ते 95 जागा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 40 ते 50 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 25 ते 30 जागा मिळण्याची शक्यता आहे. हा फक्त अंदाज आहे पण चित्र वेगळेही असू शकते. प्रत्यक्षात निकाल 2 नोव्हेंबरला लागल्यानंतर स्पष्ट होईल.

यंदा महाराष्ट्रात खिचडी निकाल काय लागणार?

महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मात्र यंदा महाराष्ट्रात राजकीय खिचडी तयार झाली आहे. यंदा प्रथमच शिवसेनेविरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे. याशिवाय एमआयएम वंचित हेही स्वंतत्र लढतील तर तिसरी आघाडीही महाराष्ट्रात तयार झाली असून त्यांनी वेगळी चूल मांडली आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानंतर मनोज जरांगे हेही त्यांचे उमेदवार उभे करणार आहेत. त्यामुळे कितीही सर्व्हेक्षणं आली तरीही महाराष्ट्राचा निकाल 23 नोव्हेंबरलाच लागणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+