आनंदाची बातमी ! ठाण्यातून नवी मुंबईला जाता येणार फक्त 30 मिनिटांत; 'हा' नवा उन्नत मार्ग लवकरच होणार
ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर पोहोचायचं म्हटलं तर, टॅफिकचे अनेक पार करावे लागतात. मात्र आता हे अडथळे दूर होण्यासाठी सिडकोने २६ किलोमिटर लांबीच्या उन्नत मार्गाचा प्रस्ताव पाठवला आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. जून महिन्यांत हे विमातळ पूर्ण क्षमतेने सुरु होईल, असे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे त्यापूर्वी सिडकोने या नवीन मार्गाचा प्रस्ताव पाठवविला आहे. या मार्गावरुन ठाण्यातून नवी मुंबई विमानतळावर साधारणः ३० ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे.

२६ किलोमिटरचा आहे मार्ग
ठाणे शहर ते नवी मुंबई विमानतळ हे २६ किलोमिटरचे अंतर आहे. या दोन्ही ठिकाणांना जोडण्यासाठी सिडको उन्नत मार्ग बांधणार आहे. या उन्नत मार्गासाठी प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे. यासाठी आर्थिक सल्लागाराची निवड केली जाणार आहे. येत्या जूनमध्ये नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होईल. हे विमानतळ व मुंबई-ठाण्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सिडको व मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यात आता ठाणे-नवी मुंबई विमानतळ उन्नत मार्गाची भर पडणार आहे.
कसा असेल हा नवा उन्नत मार्ग
दिघा येथील पटनी मैदानाजवळील धन निरंकारी चौकापासून वाशीच्या पाम बीच मार्गापर्यंत १७ किलोमीटरचा उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. तो ठाणे-बेलापूर मार्गास समांतर असेल. पाम बीच मार्गापासून थेट विमानतळापर्यंत नऊ किलोमीटरचा दुमजली उन्नत मार्ग उभारला जाईल. या मार्गामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येतून सुटका होऊन विमानतळावर विना अडथळा पोहचता येईल, असं सिडकोचं म्हणणं आहे.
प्रकल्पावर किती खर्च होणार?
या २६ किलोमीटर लांबीच्या कॉरिडोरसाठी ८,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. प्रकल्पाची व्याप्ती, मंजुरी, भूसंपादन, पर्यावरणीय मंजुऱ्या पाहता प्रकल्प सुरू होणं व तो पूर्ण होण्यासंदर्भात आता वेळ सांगता येणार नसल्याचं सिडकोच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. यासाठी लवकरच आर्थिक सल्लागाराची नियुक्ती केली जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे.












Click it and Unblock the Notifications