'निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय?'; रवींद्र चव्हाणांच्या 'त्या' व्हिडिओवरून संजय राऊत संतापले
Sanjay Raut Attack on Ravindra Chavan : महाराष्ट्रभरातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असतानाच, कल्याण-डोंबिवलीतून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदान करताना त्यांच्या शर्टवर भाजपचे निवडणूक चिन्ह 'कमळ' लावलेले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यावरून शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर अत्यंत बोचरी टीका करत सत्ताधाऱ्यांविरोधात रणशिंग फुंकले आहे.

नेमके प्रकरण काय?
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत मतदान करण्यासाठी रवींद्र चव्हाण मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्या शर्टच्या खिशावर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ स्पष्टपणे दिसत होते. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात कोणत्याही पक्षाचे चिन्ह मिरवणे किंवा प्रचार करणे हा आचारसंहितेचा भंग मानला जातो. हा व्हिडिओ समोर येताच राजकीय वर्तुळात वादाला तोंड फुटले.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2026
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे!
यांच्यावर काय कारवाई होणार?
मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात
काढा याना ठेचून
@supriya_sule
@Dev_Fadnavis
@ECISVEEP pic.twitter.com/GA9CFbKlGo
संजय राऊत यांचा प्रहार: 'आयोग विकला गेलाय का?'
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी सोशल मीडियावरून निवडणूक आयोगाला धारेवर धरले. ते म्हणाले की, "निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय?" असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना आचारसंहितेचे नियम लागू नाहीत का? केवळ विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवरच कारवाई होते का, अशी विचारणा त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'ठोकून काढू' किंवा 'ठेचून काढू' अशी भाषा वापरली होती. त्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, "मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात, मग आचारसंहिता मोडणाऱ्या आपल्या नेत्याला ठेचून काढणार का?"
निवडणूक आयोगाची भूमिका काय?
संजय राऊत यांच्या या घणाघातानंतर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. "संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची आणि व्हायरल व्हिडिओची आम्ही दखल घेतली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. आयोग कोणाचेही झुकते माप घेत नाही," असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
मुंबईत मतदानाची संथ गती आणि गोंधळ
एककीकडे आचारसंहिता भंगाचे आरोप होत असताना, मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत सुमारे २९ टक्के मतदान झाले आहे. मतदानातील गोंधळ, मतदार याद्यांमधून गायब झालेली नावे आणि ईव्हीएममधील बिघाड यावरूनही राऊत यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. "प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी गोंधळ घालण्यातच धन्यता मानली आहे," असा टोला त्यांनी लगावला.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications