Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आशिष जयस्वाल यांच्या खांद्यावर पुन्हा शिवसेनेचा भगवा, रामटेक विधानसभा मतदारसंघातून देत आहेत लढत

Ramtek Assembly Election 2024 Ashish Jaiswal Biography : शिवसेनेने मुंबई ठाणे कोकण तसेच मराठवाड्यात आपला विस्तार झपाट्याने केलेला असला तरी पूर्व विदर्भात विशेषतः नागपूर जिल्ह्यात शिवसेनेला म्हणावे तसे घवघवीत यश मिळालेले नाही. पूर्व विदर्भात काँग्रेस आणि भाजप यांच्यातच प्रामुख्याने संघर्ष झालेला दिसून येतो. मात्र शिवसेनेला सातत्याने पूर्व विदर्भातील रामटेक विधानसभा मतदारसंघातून यश मिळवून देणारा नेता म्हणजे आशिष जयस्वाल.

1999 सालापासून आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवलेला आहे. 1999, 2004 आणि 2009 अशा सलग तीन विधानसभा निवडणुकीत आशिष जयस्वाल शिवसेनेच्या झेंड्यावर या मतदारसंघातून विजयी झाले. 2014 साली युती तुटली आणि रामटेक विधानसभा मतदारसंघातून शिवसेना आणि भाजप अशी लढत झाली त्यात भाजप उमेदवार विजयी झाला.

Ramtek Assembly Election 2024 Ashish Jaiswal Biography

2019 साली रामटेक विधानसभा मतदारसंघातूनच आशिष जयस्वाल हे अपक्ष म्हणून निवडून आले. नागपूर जिल्ह्यात भाजपचा दबदबा असताना आणि देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, कॉंग्रेसचे नाना पटोले, नितीन राऊत,विजय वडेट्टीवार अशी एकाहून एक तगडी नावे समोर असतानाही रामटेक वर आशिष जयस्वाल यांचा प्रभाव कायम राहिला.

एकनाथ शिंदे यांना पाठींबा

2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. शिवसेनेच्या बहुसंख्य आमदारांनी आणि मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. महाविकास आघाडीत मंत्रीपदावर असलेले बच्चू कडू हे देखील एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिले. आणि नंतर आशिष जयस्वाल यांनीही एकनाथ शिंदे यांनाच पाठबळ दिले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीसाठी रामटेक विधानसभा मतदारसंघातून एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा आशिष जयस्वाल यांच्या नावालाच पसंती दिली आहे. मतदारसंघात राबवलेल्या विकास कामांच्या जोरावर आशिष जयस्वाल पुन्हा बाजी मारतील असा विश्वास शिवसेना नेतृत्वाला वाटत आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासाकडे लक्ष

आशिष जयस्वाल यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासाकडे अधिक लक्ष दिल्याचे दिसून येते. रामटेक, पार्श्विनी आणि मौदा तालुक्यात दोन हजार किलोमीटरचे ग्रामीण रस्ते आशिष जयस्वाल यांच्या पुढाकारातून पूर्ण करण्यात आले आहेत. ज्यामुळे या तालुक्यातील खेड्यांची शहरांची असलेली कनेक्टिव्हिटी वाढली आहे. राज्य सरकारच्या हायब्रीड एन्युइटी योजनेच्या अंतर्गत 111 किलोमीटर लांबीचा अस्फाल्ट रस्ता देखील बनवण्यात आला आहे.

तब्बल 64 बुद्ध विहारांची निर्मिती

नागपूर जिल्हा हा बौद्ध बांधवांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथेच दीक्षा घेतली होती. रामटेक विधानसभा मतदारसंघात 64 बुद्ध विहारांची उभारणी जयस्वाल यांच्या पाठपुराव्यातून करण्यात येत आहे. स्थानिक नागरिकांमध्ये अध्यात्मिक भावभावना वाढीस लागाव्यात या उद्देशाने हे काम हाती घेण्यात आले आहे.

तळागाळातील नागरिकांना हक्काचा निवारा

दिनदलित आणि पीडितांना निवास व्यवस्था उपलब्ध व्हावी यासाठी सरकारच्या विविध योजनांची अंमलबजावणी आशिष जयस्वाल यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघात प्रभावीपणे केली. आदिवासी महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या शबरी गृह निर्माण योजनेच्या अंतर्गत दहा हजार महिलांना घरे उपलब्ध करून देण्यात आशिष जयस्वाल यांची भूमिका निर्णायक राहिली. अनुसूचित जातींच्या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या रमाई गृहनिर्माण योजनेच्या अंतर्गत 4000 महिलांना घरे मिळवून देण्यात आशिष जयस्वाल यांनी सिंहाचा वाटा उचलला. तळागाळातील महिलांना या योजनेच्या माध्यमातून हक्काचा निवारा उपलब्ध करून देण्यात आशिष जयस्वाल यांना यश आले आहे.

पुलांच्या उभारणीकडेही लक्ष

आपल्या मतदारसंघात पायाभूत सुविधांचा विकास करताना अशीच जयस्वाल यांनी पुलांच्या उभारणीकडे देखील लक्ष दिले. त्यांच्या पाठपुराव्यातून कन्हाननदीवर वाघोला ते घाटरोहणा या पुलाची उभारणी करण्यात येत आहे. पेंच नदीवर सालाई माऊली पुलाची उभारणी सुरू आहे. पेंच नदीवरच नेऊरवाडा ते पाली पुलाची उभारणी देखील गतिमान करण्यात आली आहे. दहेगाव जोशी ते इसापूर या पुलाची उभारणीही जयस्वाल यांच्या पुढाकारातूनच करण्यात येत आहे.

पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार

आक्रमक नेतृत्व म्हणून आशिष जयस्वाल यांची मतदारसंघात ओळख आहे. गेल्या पंचवीस वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अफाट जनसंपर्क आपल्या पाठीशी उभा केलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या भाजपच्या दोन्ही सर्वोच्च नेत्यांची त्यांचे जवळचे संबंध आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सलोख्याचे संबंध निर्माण करण्यात आशिष जयस्वाल यांना यश आले आहे.

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर रामटेक विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा झंझावात जयस्वाल यांनी सुरू केला आहे. अपक्ष लढूनही रामटेक विधानसभा मतदारसंघ जिंकणाऱ्या आशिष जयस्वाल यांना आता शिवसेना आणि भाजप अशा दोन्ही तगड्या पक्षांची साथ मिळत आहे. त्यामुळे रामटेक वर पुन्हा एकदा आशिष जयस्वाल यांच्या रूपाने शिवसेनेचा भगवा फडकेल अशी आशा त्यांच्या समर्थकांना वाटत आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+