मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर! जनतेच्या पैशातून स्वतःचं ब्रॅण्डिग- राज ठाकरेंची टीका
raj thakceray on badalapur school girl rape case insident : "मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर ठेवण्यात आला असून जनतेच्या पैशातून स्वतःचं ब्रॅण्डिग केले जात आहे. बदलापूर येथील घटना ही पोलिसांनी हाताळली नाही. पोलिस निकामी पडले, एकदा माझ्या हातात सत्ता द्या" असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गोंदिया येथिल ग्रँड सीता हॉटेल मध्ये कार्यकर्त्या सोबत बैठक घेतली. राज ठाकरे हे सभागृहात येताच त्यांचा भव्य अशा पुष्प हारेनी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते.

राज ठाकरेंकडून नाराजी व्यक्त
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपलीं नाराजी व्यक्त केली आहे. भव्य सभा व्हायला पाहिजे होती. पण एका छोट्याश्या हॉल मध्ये सभा घेतली गेली म्हणुन त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. त्यामुळे गोंदिया येथिल सभा 10 मिनिटात गुंडाळावी लागली. तर दूसरीकडे बदलापूर येथील घटना ही पोलिसांनी हाताळली नाही. पोलिस निकामी पडले एकदा माझ्या हातात सत्ता द्यावी असेही कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
कारवाईला का वेळ लागला? - राज ठाकरेंचे ट्वीट
राज ठाकरे म्हणाले, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या…
— Raj Thackeray (@RajThackeray) August 21, 2024
बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं.
मुळात हा महाराष्ट्राच्या…
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच कायदा धाब्यावर
राज ठाकरे म्हणाले, मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असून या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही. आज सरकार 'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का ?
बहिण सुरक्षित आहे ही भावना निर्माण केली तरी पुरे..
राज ठाकरे म्हणाले, जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे,ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे. माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे.
घटनेनंतर राज ठाकरेंची ही होती प्रतिक्रीया
बदलापूरच्या शाळेत लहान लहान मुलींच्या बाबतीत जो भयानक प्रकार घडला आहे तो धक्कादायक आणि संताप आणणारा आहे. मुळात या घटनेत गुन्हा दाखल करून घेण्यातच पोलिसांनी १२ तास का लावले ? एका बाजूला कायद्याचं राज्य म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांच्याकडून झालेला हा कुठला हलगर्जीपणा? अशी प्रतिक्रीया राज ठाकरे यांनी बदलापूर प्रकरण घडल्यानंतर दिली होती.












Click it and Unblock the Notifications