Raj Thackeray: मनसेचं ठरलं! विधानसभेला एवढ्या जागा लढवणार
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना 225 ते 250 जागा लढवणार आहे. यावेळच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सत्तेत बसवणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. मुंबईत आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात आज ते बोलत होते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेचा कार्यकता मेळावा पार पडला. यावेळी बोलताना राजा ठाकरे म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय सर्व्हे होणार आहे. जे निवडून येऊ शकतात, ज्यांची शक्ती आहे, त्यांनाच यावेळी पक्षाची उमेदवारी मिळेल, याची नोंद घ्यावी. सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्याना प्रामाणिकपणे माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

युती होईल का याचा विचारच करु नका
यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर टीका केली. राज ठाकरे म्हणाले, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी युती होईल का, कोणाशी होईल याचा अजिबात विचार करू नये. आपण येणाऱ्या 1 ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार असल्याचे ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंची योजनेवरुन टीका
राज ठाकरे म्हणाले, आमच्याकडे लाडकी बहिण आणि लाडका भाऊ..अहो आमच्याकडे जर दोन्ही बहिण-भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला हव्या त्यासाठी. बहिणीला दीड हजार देणार आहेत का पैसे राज्य सरकारकडे. रस्त्यावरचे खड्डे बुजवायला पैसे नाही कुठून पैसे आणणार.
लोकांच्या मदतीसाठी पुढे या
राज ठाकरे म्हणाले, राज्यात आज पाऊस जोरदार पडत आहे. पक्ष म्हणून आणि वैयक्तिक मदतीसाठी पूढे जा. मुळ महाराष्ट्राच्या प्रश्नांकडे लक्ष द्या हीच प्रचाराची मोहीम असायला हवी. एकमेकांना शिव्या देऊन लोकांचे लक्ष भरकटवायचे आणि निवडून यायचे. यात काही अर्थ नाही.
कोण कोणत्या पक्षात कळत नाही
राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या मतदारसंघात अशी परिस्थिती आधी पाहीली नाही ज्यात कोण कुठे गेला, कोणत्या पक्षात आहे हे काहीही समजत नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व राजकीय पक्षात जे घमासान होईल ते न भुतो असेल.
राज ठाकरे म्हणाले, जो भविष्याचा सत्यनाश कशाला करुन घेतात, त्यांचेच स्थिर नाही. कशाला त्यांच्या पक्षात जाता. मागे वर्षांपर्यंत घुसले आताच्या विधानसभा निवडणुकीत कुठे कुठे घुसतील काय माहीत असा प्रश्नही राज ठाकरे यांनी म्हटले.
राज ठाकरे म्हणाले, जिल्ह्यातील मुळ परिस्थिती काय ते सर्वे करणाऱ्यांना सांगा. निवडून येण्याची क्षमता असलेल्यांनाच तयारी असलेल्यांनाच तिकीट दिले जाईल. तिकीट मिळाले की, पैसे काढायला मोकळा अशा कुणालाही तिकीट दिले जाणार नाही.












Click it and Unblock the Notifications