राज ठाकरे-एकनाथ शिंदेंची भेट; पण, भेटीचा नेमका अर्थ काय?, 'मन'भेद सरले की दबावाचं 'राज'कारण!
Raj Thackeray and Eknath Shinde goodwill meet : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली. जवळपास दोन तास या दोन्ही नेत्यांमध्ये एकांतात चर्चा झाली. यावेळी सोबत खासदार श्रीकांत शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती होती. तर या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भेटीमागचा उद्देश सांगितला. ते म्हणाले की, तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु हे सत्य आहे. ही भेट केवळ सदीच्छा भेट होती.
या भेटीचा नेमका अन्वयार्थ काय?
दुसरीकडे, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. शिवाय विधानसभा निवडणुकी वेळी निर्माण झालेली कटूता दूर करण्यासाठी शिंदे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. ही अनौपचारीक भेट असल्याचे दोन्ही पक्षांकडून स्पष्ट करण्यात आले. दोन्ही नेत्यांच्या भेटीने 'मन'भेद सरले की दबावाचं 'राज'कारण आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

राज आणि शिंदे यांच्या भेटीचं कारण काय?
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची वेळ ही अतिशय महत्त्वाची मानली जात आहे. येत्या काही महिन्यात मुंबईसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. मुंबई महापालिकेवर गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुंबई पालिकेची ही पहिलीच निवडणूक होणार आहे.
मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची मुंबईत ताकद जास्त आहे, हे विधानसभा निवडणुकीत दिसून आलं आहे. मुंबईत ठाकरे गटाची कामगिरी दमदार राहिली आहे. ठाकरे गटाचे 20 पैकी 10 आमदार मुंबईतील आहे. यावरुन ठाकरे गटाची मुंबईतील ताकद दिसून येते.
अशा परिस्थितीत महायुतीत आणखी काही बेरजेचं राजकारण करता येतं का याची चाचपणी सुरु झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा सामना करायचा असेल तर दुसरे ठाकरे सोबत असल्याचा फायदा होऊ शकतो. तसेच शिंदेंसोबत हातमिळवणी केल्यास मनसेला देखील सत्तेत येण्याची संधी असू शकते, अशीही चर्चा या भेटीतून येऊ लागली आहे.
📍 #मुंबई |
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 15, 2025
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निमंत्रणावरून आज त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी झालेल्या सदिच्छा भेटीत स्नेहभोजन आणि अनौपचारिक चर्चा केली.
यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, मनसे नेते अमित ठाकरे, मनसे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे, मनसे चित्रपट सेनेचे अमेय खोपकर,… pic.twitter.com/2GAes4Neun
एकनाथ शिंदे भेटीनंतर काय म्हणाले?
राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. आजची भेट ही केवळ आणि केवळ सदिच्छा भेट होती असंही एकनाथ शिंदे म्हणाले. बाळासाहेबांच्या आठवणीने आम्ही पुन्हा जुन्या आठवणीत रमलो असल्याचंही एकनाथ शिंदे म्हणाले.
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला
एकनाथ शिंदे म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून, विधानसभा निवडणूक झाल्यापासून भेटण्याची, गप्पा मारण्याची दोघांचीही इच्छा होती. आज बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. ही सदिच्छा भेट होती. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही.
अमित ठाकरेंच्या पराभवानंतर दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा
घरात बसून कुणालाही निवडणुका जिंकता येत नाहीत, त्यासाठी काम करणारे लोक हवेत असा टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आम्ही निवडणुका जिंकण्यासाठी काम करत नाही, तर नेहमीच काम करत असतो. माहीम विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंचा पराभव झाला होता. त्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट महत्त्वाची आहे.
राज ठाकरे सोबत आले तर आनंदच
राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, "एकनाथ शिंदे जर राज ठाकरेंच्या घरी स्नेहभोजनासाठी गेले तर त्याचे राजकीय अर्थ नक्कीच निघतील याची माहिती आहे. पण राज ठाकरे जर आमच्यासोबत आले तर नक्कीच आम्हाला आनंद होईल. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध हे फार जुने आहेत."
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications