शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर PM मोदींनी माफी का मागितली? राहूल गांधींनी सांगितलं हे कारण लावले आरोप!
Rahul Gandhi on BJP : राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा पडला यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पंतप्रधानांनी माफी का मागितली याचं उत्तर राहूल गांधी यांनी दिलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने भ्रष्टाचार केला म्हणून पुतळा पडला असा आरोप राहूल गांधी यांनी केला.
काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व स्मारक लोकार्पण कार्यक्रमानिमित्त राहूल गांधी सांगलीत आले आहेत. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला आहे. त्यानंतर ते सभेला मार्गदर्शन करत आहेत.

राहूल गांधी म्हणाले, भाजपला भीती दाखवण्याचे काम सांगलीतील नेते करत आहेत. आज येथे येऊन मला आनंद झाला. पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण इथे आलो आहोत. पतंगरावांनी विकासाचं काम केलं आणि काँग्रेससोबत ते अखेरपर्यंत राहील्याचं त्यांनी म्हटलं.
राहूल गांधी म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकरांनी महाराष्ट्रातच नाही तर पुर्ण देशाला जीवन जगण्याचे सूत्र, प्रगती आणि प्रेरणा दिली. महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा खोलवर रुजलेली आहे. त्यामुळे मी जेव्हा येथे येतो तेव्हा आनंद होतो ही माझी भावना आहे. येथे काँग्रेसचा डिएनए आहे. महाराष्ट्रात विचारधारेची लढाई सुरु आहे. आज देशात विचारधारेचं युद्ध सुरु आहे एकीकडे काँग्रेस पक्ष आणि सर्व महापुरुष तर दुसरीकडं भाजप आहे. आम्ही सर्वांना जोडून पुढं नेण्याचा प्रयत्न करतो पण ते अर्थात भाजप जातीव्यवस्थेची उतरंड जशी आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्न करत आहे,
राहूल गांधी म्हणाले, भाजपवाले जाती-जातीत भाषा-भाषात भांडणं लावत आहेत. मणीपूरमध्ये हिंसाचार होत आहे दीड वर्ष मणीपूर धुसमसतंय तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले नाही ते जाऊ शकत नाही. भारत जोडो यात्रेत मी एकटाच नाही तर सर्वच लोक पायी चालले. नफरत की बाजार मे मोहब्बत की दुकान खोलने हे आमचे ध्येय आहे. आम्ही परस्पर सौहार्द आम्हाला हवे आहे.
राहूल गांधी म्हणाले, देशातील कानाकोपऱ्यात भाजपवाले भांडण लावत आहे. शिवाजी महाराजांची, महात्मा फुलेंची आणि काँग्रेसची विचारधारा मिळती-जुळती आहे. महापुरुषांचे चरित्र वाचले तर आपल्याला कळेल की, त्यांचे विचार आणि काँग्रेसचे विचार एकच आहेत. निवडणुकात आम्ही स्पष्ट सांगितले की, लढाई विचारधारेची आहे. भाजप देशात भांडण लावायचं काम करत आहे.
राहूल गांधी म्हणाले की, आरएसएसचे असतील तर मेरीट नाहीतर तुम्हाला काहीच जागा नाही. ते संविधानावर रोज काही न् काही आक्रमण करत आहेत. भारतात आज काय स्थिती आहे आम्ही भाजपवर दबाव टाकत आहोत. सर्वजण म्हणतात की, जातीनिहाय जनगणना करा त्यानंतर आरएसएस काही दिवसांपुर्वी म्हणते की जातीजनगणना गरजेची आहे. मग मागील सहा महिन्यात ते विरोध का करत होते.
राहूल गांधी काहीही होऊ द्या काँग्रेस जातनिहाय जनगणना करणार आहोत. या देशाच्या पैशांचा फायदा कुणाला होतोय कुणाला होत नाही हे आम्ही जाणून घेणार आहोत. माफी तेच मागतात जे चुकीचे काम करतात, ज्यांनी चुकच केली नाही ते कशाला माफी मागतील. शिवरायांचा राजकोट येथील पुतळा पडला तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितली. पंतप्रधानांनी का माफी मागीतली याचे अनेक कारणं आहेत.
- मुर्ती तयार करण्यासाठी आरएसएसच्या लोकांना कंत्राट दिले
- मुर्तीच्या निर्मितीत भ्रष्ट्राचार झाला त्यामुळे पंतप्रधनांनी माफी मागितली
- शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला पण एवढेही लक्ष दिले नाही की पुतळा सक्षमपणे उभा राहायला हवा.












Click it and Unblock the Notifications