मारकडवाडी प्रकरणावर आता थेट कलेक्टरच बोलले; सांगितली A टू Z माहिती
Collector of Solapur regarding the Markadwadi case- मतदान घेण्याचे अधिकार फक्त निवडणूक आयोगाला आहेत. ते इतर कुणालाही नाहीत. तुम्हाला जर काही तक्रार असेल, तर तुम्ही कोर्टात जावं. पण अशी निवडणूक घेण्यास कुणाला मुभा देता येत नाही, अशा शब्दात आज सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी त्यांच्या कारवाईबाबत माहिती दिली. माळशिरस तालुक्यातील मारकळवाडी राज्यात नाही, तर थेट देशभरात चर्चेत आलं आहे. त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची व एकंदर मतदानाच्या दिवशीची माहिती सर्वांना कळावी, म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पत्रकार परिषद घेत ए टू झेड माहिती दिली.

मारकळवाडीची देशभर चर्चा
सध्या सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावाची चांगलीच चर्चा सुरु आहे. या गावातून महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर यांच्यापेक्षा भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना जास्त मते मिळाली. मात्र सातपुते यांना जास्त मते मिळूच शकत नाहीत, असा दावा या गावातील काही ग्रामस्थांनी केला. त्यानंतर त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रशासनाने हाणून पाडला. काही ग्रामस्थांवर गुन्हेही दाखल करण्यात आले. आज शरद पवारांनी या गावाला भेट दिल्यानंतर जास्त चर्चा सुरु झाली. त्यामुळेच नागरिकांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
काय म्हणाले जिल्हाधिकारी?
कुमार आशिर्वाद म्हणाले, "20 नोव्हेंबरला निवडणुकीची झाली. 23 तारखेला मतमोजणी झाली. मारकडवाडी ग्रामस्थांनी 29 तारखेला निवेदन दिले. हा निकाल आम्हाला मान्य नसल्याचे सांगत, त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती केली. पण नियमानुसार केवळ निवडणूक आयोगाला व त्यांनी सांगितले तर प्रशासनालाच ते अधिकार आहेत. कायद्यानुसार इतर कुणालाही ते अधिकार नाहीत. त्यामुळे त्यांचे निवेदन अमान्य करण्यात आले. तरी देखील ग्रामस्थांनी स्वतः मतदान करण्याचा निर्णय घेतला, असं जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितलं.
मतदान घेता येत नाही, यावर ठाम
आशीर्वाद म्हणाले, "पोलीस नीट काम करत नाहीत म्हणून कुणालाही स्वतःचा तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येत नाही. मतदानचही तसंच आहे. ग्रामस्थांचा मूड पाहिल्यानंतर आम्ही 2 ते 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली. त्याचे उल्लंघन केले म्हणून 89 लोकांवर गुन्हे दाखल केले. मारकडवाडी येथे मतदान का करू दिलं नाही? असा प्रश्न सध्या चर्चेत आहे. परंतु, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाहीत. ग्रामस्थांना निकालावर संशय असेल, तर त्यांनी कोर्टात याचिका दाखल करू शकतात. पण स्वतःला असं मतदान घेता येणार नाही", असं सांगत जिल्हाधिकारी आपल्या मतावर ठाम राहिले.












Click it and Unblock the Notifications