आम्ही बँकेला सांगितलं बिना गॅरंटीचं कर्ज द्या! गॅरंटीच हवी असेल तर मोदी हजर - वाचा काय म्हणाले PM?
PM Narendra Modi on mudra loan jan dhan yojana : आधी जनधन खाते उघडून त्यात जास्त खाती महिलांची उघडली नंतर मुद्रा योजना आणली आणि आम्ही बँकेला सांगितलं की बिना गॅरंटीचे लोन द्या आणि जर गॅरंटी हवी असेल तर मोदी हजर आहे असं वक्तव्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना आत्मविश्वास दिला.
जळगावमध्ये लखपती दीदी योजनेचा शुभारंभ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, जनधन खाते उघडून जे मुद्रा लोन दिलं गेलं असून या योजनेच्या लाभार्थी 70 टक्के महिला आहेत. त्यावेळी काही लोक म्हणत होते की, महिलांना कर्ज देऊ नका त्या परत करु शकणार नाहीत. पण मातृशक्तीवर पूर्ण विश्वास आहे माता भगिनींनी मेहनत केली आणि इमानदारीने कर्ज देखील परत केली आता तर मुद्र लोनची मर्यादा तीस लाख रुपये केली आहे.
महिला अत्याचारावर भाष्य
महिला अत्याचारांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे. ते म्हणले की, महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार महिलांच्या सोबत आहे. राज्याच्या सोबत आहे. अत्याचार करणारी मानसिकता आपल्याला दूर करायची आहे, सरकार येतील सरकार जातील पण नारी स्वाभिमानाचे रक्षण समाजाच्या, सरकारच्या रूपात करणे ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कठोर कायदे देखील करत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
महाराष्ट्रातील महिलांवर मां जिजाऊं,सावित्रीबाईंची छाप
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणले की, समाजात मुलींना शिक्षणाला महत्व दिले जात नव्हते व सावित्रीबाई फुले भारताच्या मातृशक्तीने समाजाने राष्ट्राचे भविष्य बनवण्यास मोठे योगदान दिले आहे आणि आता आपला देश विकसित बनण्यासाठी मेहनत करत आहे तर पुन्हा आपली मातृशक्ती पुढे येत आहे, महाराष्ट्रातील माझ्या सगळ्या बहिणी ती चांगलं काम करत आहेत तुमच्या सगळ्यांमध्ये मी राजमाता जिजाऊ, सावित्री फुले यांची छाप पाहतो.
महाराष्ट्रात नवीन एक लाख लखपती दिदी
पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील दहा वर्षात एक कोटी लखपती तिथे बनल्या आहेत आणि मागील दोन महिन्यात फक्त दोन महिन्यात अकरा लाख लखपती दीदी जोडल्या गेल्या आहेत यात सुद्धा एक लाख नवीन लखपती दीदी आपल्या महाराष्ट्रात तयार झाल्याआहेत महायुतीच्या सरकारने पण खूप मेहनत केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादांची पूर्ण टीम माता आणि महिलांना सशक्त करण्यास झोकून देऊन काम करत आहे.
लखपती दिदी हे पुढच्या पिढ्यांना सशक्त करण्याचे अभियान
लखपती दीदीअभियानाद्वारे फक्त माता-भगिनींची कमाई वाढवण्याचा उद्देश नाही तर पूर्ण परिवार आणि येणाऱ्या पिढ्यांना सशक्त करण्याचे महान अभियान आहे. हे अभियान गावाच्या पूर्ण अर्थकारणाला बदलत आहे. प्रत्येक महिलेला माहित आहे की जेव्हा ती कमवायला लागते तेव्हा तिचा कसा अधिकार वाढतो? तिचा परिवारात तिचा सन्मान वाढतो. जेव्हा एखाद्या महिलेची कमाई वाढते तेव्हा परिवाराकडेही पैसा जास्त येतो एका भगिनीचे लखपती बनणे हे पूर्ण परिवाराचे भाग्य बदलणारे आहे.
महिलांसाठी मोदी सरकारचे काम सर्वात जास्त
भारत जगातील सर्वात मोठी तिसरी अर्थव्यवस्था बनत आहे, यात माता भगिनींचा देखील मोठा वाटा आहे, महिलांना मदत मिळेल याची गॅरंटी घेणार कोणी नव्हतं देशातील कोट्यावधी महिलांच्या नावावर प्रॉपर्टीज नव्हती त्यांना बँकेकडून लोन घ्यायचा ते मिळत नव्हते यामुळे या भावाने या मुलाने एक संकल्प केला काहीही झालं माझ्या देशातील बहिणींचा त्रास दूर झाला पाहिजे महिलांच्या हितांचे निर्णय घेतले.
आधीच्या सरकारांचे सात दशकं वेगळी आणि अजून मोदी सरकारचे दहा वर्षे वर्षांतील महिलांसाठीची कामे यांची तुलना केली तर निश्चितच मोदी सरकारच्या कामाचे पारडे जड आहे. असं मोदींनी ठणकावून सांगितले,.
चार कोटी महिलांच्या नावावर घरे
मोदी म्हणाले की, गरिबांचे घर सरकार बनवते ते महिलांच्या नावावर रजिस्टर व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न केले. आतापर्यंत चार कोटी घरे निर्माण केली. यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्या नावावर करण्यात आली आणी आता आणखीन तीन कोटी घरे सरकार निर्माण करणार असून त्यातील जास्तीत जास्त घरे महिलांच्याच नावावर असतील.
महिला भारतीय अर्थकारणाची मोठी ताकद
पूर्वी मी सखी मंडळांबद्दल सांगायचो. सेल्फ हेल्प ग्रुपबाबतही बोलायचो पण हे फार कमी लोकांनाच याचं महत्व माहीत होतं, आता पाहू शकता की भारतीय अर्थकारणाची ही मोठी शक्ती बनत आहेगावागावात महिलाद्वारेचे परिवर्तन येतंय सर्वांसमोर आहे. हा आकडा देखील खूप मोठा आहे. मागील दहा वर्षात दहा कोटी बहिणी या अभिनयाची जोडल्या आहेत आणि आम्ही यांनाही बँकांशी जोडले आहे, त्यांना बँकेतून सोपे आणि स्वस्त लोन दिले आहे.
दहा वर्षांत 9 लाख कोटींची मदत
मोदींनी सांगितले की, 2014 पर्यंत 25000 कोटींपेक्षा कमी बँक लोन्स सखी मंडळांना मिळाले होते पण मागील दहा वर्षात जवळजवळ नऊ लाख कोटींची मदत दिली गेली आहे एवढेच नाही सरकार जे सरळ मदत देते त्यात देखील 30 टक्क्यांची वाढ झाली आहे याचा परिणाम आज गावातील भगिनींचे उत्पन्न वाढत आहे आणि देशाला मजबूत बनवत आहेत हा तर आता फक्त ट्रेलर आहे आता मागील महिन्यात देशाचे बजेट आलं यात महिलांशी संबंधित योजना साठी तीन लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी नारी शक्ती कायदा
महिलांनी मुलींनी जास्त संख्येने व्यवसाय नोकरी करावे म्हणून कार्यालयात, कारखान्यात त्यांच्यासाठी सुरक्षा प्रदान करणारे कायदे केले आहेत, विशेष सुविधा राहण्यासाठी वर्किंग हॉस्टेल्स मुलांसाठी सुविधा यासाठी केंद्र सरकार काम करत आहे आमचे सरकार मुलींसाठी आणखीन सेक्टर उघडत आहे ज्यावर कधी बंदी होती तिन्ही सेनांमध्ये मध्ये महिलांची भरती होत आहे सगळ्या क्षेत्रात महिलांच्या संख्येत झाली आहे गावापासून ते स्टार्टअप क्रांती पर्यंत अनेक मोठ्या पदांवर महिला मोठ्या संख्येने नेतृत्व करत आहेत, त्यांच्या सुरक्षेसाठी नारीशक्ती बंधन कायदा देखील केला, असही पंतप्रधान मोदींनी सांगितलं
महिलांवर अत्याचार करणा-यांसाठी कठोर कायदे
पंतप्रधान म्हणाले की देशातील कुठलेही राज्य असो मातांच्या समस्या आणि त्यांच्या राग मी समजू शकतो. मी देशातील प्रत्येक राजकीय पक्षाला, राज्य सरकारांनाही आवाहन करतो की महिलांवर अत्याचार हे अक्षम्य पाप आहे. कोणीही दोषी असेल तो वाचला नाही पाहिजे. त्याला कुठल्याही रूपात मदत करणारे वाचले नाही पाहिजेत. शाळा असो कॉलेज असो कार्यालय असो किंवा पोलीस व्यवस्था जिथे निष्काळजीपणा होतो त्याचा हिशोब झाला पाहिजे. वरून खालीपर्यंत साफ संदेश गेला पाहिजे.
सरकार येतील सरकार जातील पण जीवनाचे रक्षण, नारी स्वाभिमानाचे रक्षण समाजाच्या, सरकारच्या रूपात करणे ही आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कायदे देखील कठोर करत आहे. पीडित महिला पोलीस स्टेशनला न जाता ई एफ आय आर नोंदवू शकतात, यामुळे त्याच्या एफआयआरमध्ये कोण बदल करू शकणार नाही त्यामुळे दोषींना कठोर शिक्षा मिळण्यात मदत होईल
जगभरातील गुंतवणुकदारांना महाराष्ट्राचे आकर्षण
आज भारत विकसित होण्याच्या मार्गावर पुढे जात आहे आणि यात महाराष्ट्राची खूप मोठी भूमिका आहे महाराष्ट्र विकसित भारताचा एक चमकता तारा आहे. महाराष्ट्र जगभरातील गुंतवणूकदारांच्या आकर्षणाचे केंद्र बनत आहे महाराष्ट्र भविष्य जास्तीत जास्त गुंतवणूक आणि नोकरीच्या नवीन संधी निर्माण करणे ही केंद्र आणि महायुतीचे सरकारची गॅरंटी आहे महाराष्ट्राच्या विकाससाठी पुढील अनेक वर्षांसाठी स्थिर सरकारची गरज आहे महाराष्ट्रातील समृद्धीसाठी येथील माता भगिनी पुढे येऊन मला साथ देतील याचा मला पूर्ण विश्वास आहे, अशा विश्वासही पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.












Click it and Unblock the Notifications