Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

जमीन घोटाळा! पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही? अजितदादांना 'या' महिला नेत्याचा सवाल VIDEO बघा

Parth Pawar's Alleged ₹1800 Cr Scam : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका व्हिडिओद्वारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पार्थ पवार यांच्या कथित कोट्यवधी रुपयांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात, कायद्यासमोर सगळे समान असतानाही पार्थ पवारांना का वाचवले जात आहे, असा थेट सवाल अंधारे यांनी केला आहे.

अजित पवार यांनी 'पार्थ पवार यांनी केलेल्या कोणत्याही जमीन व्यवहाराची आपल्याला माहिती नाही,' असे जे विधान केले होते, त्यावर विश्वास ठेवूनच, 'जे काही करायचे ते संविधानाने होऊ दे,' असे म्हणत अंधारे यांनी घटनेतील तरतुदीकडे लक्ष वेधले.

Parth Pawar s Alleged    1800 Cr Scam

जमीन व्यवहाराची किंमत

पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीनीचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी १८०४ कोटी रुपये मुल्यांकन असल्याचे म्हटले आहे. पण ती जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याचे म्हटले जात आहे.

नेमका सवाल काय आहे?

सुषमा अंधारे यांनी व्हिडिओत म्हटले की, आम्ही अत्यंत नम्रपणे हे सांगितलं पाहिजे की संविधानातल्या प्रकरण तीन कलम 14 मध्ये सांगितले की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग ज्याचे मूल्यांकन बाजारभावाप्रमाणे 294 कोटी 65 लाख 89 हजार मोबदला इतके आहे आणि साधारणता 300 कोटी रुपयांची देय आहे.

यापैकी जास्त रक्कम म्हणजेच कोटी रुपये आणि मुद्रांक अधिनियमाचे अनुच्छेद 25 व प्रमाणे पाच टक्के तथा स्थानिक संस्था कर एक टक्का तसेच मेट्रो कर एक टक्का असे एकूण 21 कोटी ज्याचे मुद्रांक शुल्क म्हणजे 21 कोटीची ध्येय होते सदर दस्ता, जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडे लेटर ऑफ इंटेड पत्र म्हणतोय त्या इरादा पत्रातला जोडलेला आहे. त्यामध्ये एक सही अमद्विजय पाटील जोडलेला आहे आणि स्पष्टपणे त्यातली सवलत मागितलेली आहे ती सवलत मागताना खाली ज्या सही आहेत त्यामध्ये एक सही अमर दिग्वजिय पाटील आणि दुसरी सही जे आहे ते पार्थ पवार यांची आहे.

पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल झाला नाही? - अंधारे

संपूर्ण प्रकरणातल्या सर्व अधिकाऱ्यांच्या जी काही महत्वाचे अधिकारी त्यांचे निलंबनची प्रक्रिया चालू आहे कारवाई चालू आहे यातल्या शितल तेजवानी आणि पाटील यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला आहे मग जर सगळं संविधानाने करायचे आणि संविधानात सांगितले की कायद्यासमोर सगळे समान आहेत तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारावर गुन्हा दाखल होत नाही हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि न्यायप्रिय असणाऱ्या अजित दादांना अजिबात मानवणारे नसेल त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवले जात आहे याचे उत्तर आता गृह मंत्रालयाने द्यायला हवं असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे.

अंधारेंचा सवाल

सुषमा अंधारे यांनी म्हटले की, "सन्माननीय अजित दादा यांना पार्थ पवार ने केलेल्या कुठल्याही जमीन व्यवहाराची कसलीही माहिती नाही या त्यांच्या विधानावर आमचा विश्वा स आहे की जे काही करायचे ते संविधानाने होऊ दे.

"संविधानात सांगितले आहे की, कायद्यासमोर सगळे समान आहेत. मग, पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होत नाही, हे न्यायप्रिय असणाऱ्या अजित दादांना मानवणारे नसेल. त्यामुळे पार्थ पवारांना नेमकं कशामुळे वाचवले जात आहे, याचे उत्तर आता गृह मंत्रालयाने द्यायला हवे," अशी मागणी अंधारे यांनी केली.

पार्थ पवार गैरव्यवहार: थोडक्यात प्रकरण

पार्थ पवार यांच्याशी संबंधित एका जमीन व्यवहारावर हा आक्षेप आहे. या जमिनीचे बाजारमूल्य सुमारे ₹२९४ कोटींपेक्षा जास्त असतानाही, यावर भरायचे असलेले अंदाजे ₹२१ कोटींचे मुद्रांक शुल्क आणि इतर कर योग्य प्रकारे भरले गेले नाहीत, असा आरोप आहे. या व्यवहारात मुद्रांक शुल्कात सवलत मिळावी म्हणून जिल्हा उद्योग केंद्राकडे अर्ज केल्याचे म्हटले जाते. या प्रकरणात कथितरित्या सामील असलेल्या काही सरकारी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन निलंबनाची कारवाई झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+