दलित आहे म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप, फडणवीसांवरही हल्लाबोल
Rahul Gandhi on Somnath Suryavanshi murder case : परभणीत 10 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती.
या घटनेच्या 12 दिवसांनंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज (दि.12) परभणीत जाऊन परभणीतील हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सोमनाथ यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली.

यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी हत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकरणी न्यायाचीही मागणी केली. राहुल यांनी पीडित कुटुंबीयांशी अगदी जमिनीवर बसून संवाद साधला.
#WATCH | Maharashtra | After visiting violence-hit Parbhani, Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "I have met the family and those who have been killed and beaten up. They showed me the post-mortem report, videos, photographs. This is 100% a custodial death. He has been murdered and… pic.twitter.com/cVDYA0RgIM
— ANI (@ANI) December 23, 2024
दरम्यान, राहुल गांधी आंबेडकरी कार्यकर्ते विजय वाकोडे यांच्याही कुटुंबीयांची भेट घेतली. वाकोडे यांचे हिंसाचारानंतर हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्यांचे येथील हिंसाचार रोखण्यात मोठे योगदान होते.
महाराष्ट्र: लोकसभा के नेता प्रतिपक्ष राहुल गांधी ने परभणी का दौरा किया, जहां उन्होंने पुलिस हिरासत में मारे गए दलित समाज के सोमनाथ सूर्यवंशी के परिवार से मुलाकात की। 10 दिसंबर की शाम को बाबा साहेब अंबेडकर प्रतिमा के पास संविधान की रेप्लिका को क्षतिग्रस्त किए जाने के बाद हिंसा… pic.twitter.com/AY5zyXpivH
— IANS Hindi (@IANSKhabar) December 23, 2024
सोमनाथची हत्या पोलिसांनीच केली
राहुल गांधी म्हणाले की, "पोस्टमार्टेम रिपोर्टमधून स्पष्ट झालंय की शंभर टक्के ही हत्या आहे. पोलिसांनीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथची हत्या केली. सोमनाथ दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास व्हावा. या प्रकरणात राजकारण नको तर न्याय हवा.

परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाल्यानंतर बंद पुकारण्यात आला होता. या बंददरम्यान काही समाजकंटकांनी हिंसक आंदोलन केले ज्यामुळे पोलिसांनी धरपकड केली. या कारवाईत 35 वर्षीय तरुण वकील सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक झाली होती. न्यायालयीन कोठडीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता.

(राहुल गांधी यांनी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला, फोटो क्रेडिट-ANI BHarat)
10 लाखांनी बलिदानाचा विषय संपतो का? -थोरात
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी परभणीच्या मुद्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, परभणीतील ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे याबाबत शंका नाही. परंतु सत्ताधाऱ्यांची मानसिकता पाहिल्यानंतर त्यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? सर्वोच्च सभागृहात ज्या पद्धतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करत आहेत, त्यावरून त्यांची पुरोगामी विचाराकडे पाहण्याची दृष्टी दुर्दैवी आहे. जनतेने हे सर्व जागृतपणे पाहिले पाहिजे.
संतोष देशमुख यांचे बलिदान वाया जाता कामा नये. 10 लाख रुपयांच्या मदतीने बलिदानाचा विषय संपतो का? असा सवाल काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर टीका केली. यातून सत्ताधाऱ्यांची मानसिकता दिसून येत आहे. जाती-धर्माच्या नावाखाली विष पसरवण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, हे स्पष्टपणे दिसत आहे. तुमच्या 10 लाखाने हा विषय संपत नाही. तुमची मानसिकता बदलणे हा मूळ विषय आहे, असे थोरात म्हणाले.












Click it and Unblock the Notifications