Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वाल्मिक कराडच्या प्रश्नावर पंकजा मुंडेंचा पारा चढला, नेमकं काय झालं; ट्रम्पवर बोलता..दमानियांचा टोला

Why Pankaja Munde got angry with journalists in Pune : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सीआयडीने दीड हजार पेक्षा अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मास्टरमाईंड असल्याचा दावा आरोप पत्रात केला आहे. यासंदर्भात पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला असता त्या पत्रकारावरच संतापल्याचे पाहायला मिळाले. पुण्यात त्या पत्रकारांशी संवाद साधत होत्या. यावेळी त्यांना वाल्मीक कराड यांच्यासंदर्भात प्रश्न करण्यात आला. त्यानंतर त्यांचा पारा चांगलाच चढलेला दिसला.

का म्हणाल्या पंकजा मुंडे?

बीड हत्या प्रकरणात वाल्मीक कराडच मुख्य सुत्रधार असल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे, असा प्रश्न पत्रकारांनी पंकजा मुंडे यांना विचारला. त्यावर उत्तर न देता पंकजा मुंडे रागावल्या. मी सद्या पुणे शहरात आहे. पुण्यातील स्वारगेट प्रकरणाची मी चौकशी व पाहणी करण्यासाठी आले असता मला येथील प्रश्न का विचारत नाहीत तुम्ही लोक. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी आता पुण्यात आहे तर मला पुण्यातील प्रश्न विचारा, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. यावेळी त्या आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाल्या.

मला बीडचे प्रश्न का विचारतात?

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला बीडचे प्रश्न का विचारता. त्या आरोपपत्रात काय लिहिले तुम्ही वाचले का? दोषारोपपत्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. तुमच्यावर कोर्ट ऑफ कन्टेट दाखल होईल. बीडचा विषय मागे पडला आहे. तुम्हाला टार्गेट दिले आहे, ते प्रश्न तुम्ही विचारत आहे. मी आता पुण्यामध्ये आहे. पुण्यामध्ये महिलेवर स्वारगेट एसटी स्टँडमध्ये बलात्कार झाला आहे. मला तो प्रश्न विचारा, मी पुण्यात आलेली आहे. तर मला बीडचे प्रश्न का विचारतात.? असा सवाल पंकजा मुंडे यांनी पत्रकारांना केला. पुण्यात त्या मुलीवर बलात्कार झाला. तो प्रश्न का विचारत नाही? नांदेडमध्ये काल अत्याचाराचा प्रकार घडला. संपूर्ण राज्यात असे प्रकार घडत आहेत, असेही पंकजा मुंडे यांनी म्हटले.

Pankaja Munde

मुख्यमंत्री फडणवीसांवर माझा पूर्ण विश्वास

मी गृह खात्याशी संबंधित नाही आणि गृह खात्याच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती देणे योग्य आहे. ते जी काही माहिती द्यायची ती कोर्टाला देतील. त्यानंतर जे योग्य आहे ती कारवाई व्हावी. माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर संपूर्ण विश्वास आहे. त्यांनी याबाबत एकदा शब्द दिल्यानंतर त्यांच्या टीम मधील एक मंत्री म्हणून मी वारंवार याबाबत भाष्य करणे माझ्या भूमिकेला साजेसे नाही. संवेदनशीलपणे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, जलद गतीने झाली पाहिजे हे माझे एक हजार एकवेळा बोलून झालेले आहे, असे देखील पंकजा मुडे म्हणाल्या.

देशमुख कुटुंबियांविषयी मी किती वेळ बोलू?

'देशमुख यांच्या हत्याबाबत तीव्र निषेध आणि तसेच या प्रकरणाची वेगळी चौकशी करावी हे मी किती वेळा बोलू? घटना घडल्यापासून मी त्यावर बोलत आहे. 12 डिसेंबरचे माझे भाषण काढले तर त्यामध्ये 90 टक्के मी त्याबाबतच बोलले आहे. आता त्याच्या आतल्या बाबींवर बोलण्याचा औचित्य नाही आणि मला माहिती देखील नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

अंजली दमानियांनी घेतला समाचार, म्हणाल्या- ट्रम्पविषयी विचारले पाहिजे नाही का?

दरम्यान पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर टीका सुरु झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, पंकजा मुंडे यांचे वक्तव्य ऐकून धक्का बसला. त्या म्हणतात मी पुण्यात आलीये तर इथले प्रश्न विचारा? बीडवर नको. तुम्ही बीडच्या आहात. परळीमध्ये आहात. मग तुम्हालाच तेथील प्रश्न विचारणार ना? तुम्ही अमेरिकेत गेलात तर आम्ही तुम्हाला ट्रम्पवर विचारायचे का? असा खोचक टोला त्यांनी लगावत पंकजा मुंडे यांचा समाचार घेतला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+