पंढरपूर यात्रा पालखी सोहळ्यात 'या' दोन दुर्दैवी घटना, दोघांचा मृत्यू! व्यक्त होतेय हळहळ
सोलापूर : पंढरपूर यात्रा पालखी सोहळ्यात दोन दुर्दैवी घटना घडल्या आहेत. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यादरम्यानच्या घटना असून यात दोघांचा मृत्यु झाला आहे. या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळही व्यक्त होत आहे.
छायाचित्रणावेळी दुर्घटना
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात छायाचित्रण करण्यासाठी पश्चिम बंगाल येथील कल्याण चट्टोपाध्याय ( वय ४८ ) हे बुधवारी आले होते . गुरुवारी पुरंदावडे येथे रिंगण सोहळ्याचे छायाचित्रण करीत असताना माउलीचा अश्व धावत असताना स्वाराचा उजवा पाय माउलीच्या अश्वाच्या लगाममध्ये अडकल्याने तो धावत असताना अडखळला व रिंगण पाहण्यासाठी बसलेल्या भाविकांच्या अंगावर पडला . त्यामध्ये दोघे जखमी झाले .

बंगालच्या छायाचित्रकाराचा मृत्यू
पोलिसांच्या माहितीनुसार, माऊलीच्या पालखी सोहळ्यात गोल रिंगण सुरु असताना अश्व पडल्याने चटोपाध्याय यांना चक्कर आली. यात ते बेशुध्द पडले. त्यानंतर अकलुज येथे उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले. तेथील डाॅक्टरांनी उपचारापुर्वीच त्यांना मृत घोषित केले.
कल्याण चट्टोपाध्याय असे त्यांचे नाव असून ते मिताली अपार्टमेंट, मोंडल पारा रोड,नॉर्थ 24,पर्गानास, बारानगर, कोलकत्ता, पश्चिम बंगाल येथील रहिवासी होते . याबाबत सोलापुर ग्रामिणच्या अकलुज पोलीस ठाण्यामधे अनैसर्गीक मृत्युची नोंद आज सायंकाळी पावणे आठच्या दरम्यान केली. आशुतोष अप्पासाहेब कोळी(रा.जयसिंगपुर,जि.कोल्हापुर) यांनी खबर दिलेली आहे.
विमा रकमेसाठी प्रयत्न
याबाबत पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी ही दु:खदायक घटना असल्याचे सांगीतले. घटनेचे चित्रीकरण पाहील्यास मागच्या अश्वाचा अंगभाग हा व्यक्तीच्या अंगावर पडल्याचे दिसतेय. अशा वेळी पोलीस आणि एनएसएसचे विद्यार्थी यांनी उपचारासाठी रुगाणवाहीका करुन दिली. चटोपाध्याय हे हौशी छायाचित्रकार होते. आज माळशिरस मुक्कामी समाज आरतीमधे त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली . तसेच वीमा रक्कम मिळण्यासाठी आळंदी देवस्थानकडुन प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले .
वारकऱ्याचा हार्टअॅटॅकने मृत्यू
जगद्गुरु संत तुकाराम महाराज दिंडीचे आगमन अकलूज येथे झाल्यानंतर उद्धव बुवा महाराज यांचे दिंडी मधील रथा पाठीमागे असलेल्या दिंडी क्रमांक 34 मधील वारकरी विनायक यशवंत पवार ( वय 65 ) राहणार नारंगवाडी तालुका उमरगा जिल्हा धाराशिव हे आज रोजी सकाळी विजय चौक अकलूज येथे दिंडीमध्ये असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला.












Click it and Unblock the Notifications