Santosh Deshmukh Murder Case- आज लातूरात तर उद्या बीडमध्ये मोर्चा; ते बॅनर्स लक्षवेधी
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेविरोधात आज लातूरातील रेनापूरात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तर उद्या (शनिवारी) बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. 'संतोष देशमुख यांची हत्या म्हणजे माणुसकीची हत्या' असा उल्लेख असलेले बॅनर्सवर सध्या बीड जिल्ह्यात लागले आहेत.

रैनापुरात आज आक्रोश मोर्चा
दोषींना शिक्षा करावी, फरार असलेल्यांना अटक करावी, देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा, आदी मागण्यांसाठी आज लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. रैनापुर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातील लोक या मोर्चात सहभागी होणार आहेत. संतोष देशमुख यांच्या परिवारातील अनेक सदस्यया मोर्चात सहभागी होणार आहेत.
बंदूक परवाने रद्द करण्याची मागणी
बीड जिल्ह्यात सध्या 1222 बंदुक परवानाधारक आहेत. इतर जिल्ह्यांपेक्षा एकट्या बीड जिल्ह्यात पाच ते सहा पट बंदुकीचे परवानाधारक आहेत. या परवानाधारकांची पूर्णतपासणी करण्यात यावी आणि सर्व बंदुकीची लायसन रद्द करावेत, अशी मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.
खा. सोनवणे यांचीही मागणी
जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावं, हा सत्ताधारी पक्षाचा विषय आहे. तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल, तर अजित पवार यांनीच बीडचे पालकमंत्रीपद स्वीकारावे आणि या प्रकारणाचा सोक्षमोक्ष लावावा, अशी मागणी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.












Click it and Unblock the Notifications