मनोज जरांगेंची ईडी मार्फत चौकशी करा, ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारेंची मागणी

OBC protester Navnath Waghmare on Manoj Jarange Patil : ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या जोरदार निशाणा साधत जरांगे पाटलांची ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटीत पुन्हा उपोषणाला बसले आहेत. तर तिथून काही अंतरावरच वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे ओबीसी बचाव आरक्षणासाठी उपोषण करत आहेत.

मनोज जरांगेच्या आंदोलनामधून दहशत माजवण्याचं काम आणि ओबीसींवर दबाव टाकण्याचा काम सुरू आहे. मनोज जरांगे यांनी अभ्यास करावा. रात्री येऊन जर मंत्री भेटत असतील तर त्यांचं काम काय आहे? रात्रीच खेळ चाले... रात्रीत बंद दाराआड काय चालतं? याबाबत सरकारने चौकशी करावी असं नवनाथ वाघमारे म्हणाले.

Maratha OBC Controversy

जरांगेंच्या मागे मुख्यमंत्री आणि तुतारीवाल्याचा हात

वाघमारे पुढे म्हणाले की, आमची केंद्र आणि राज्य सरकारला विनंती आहे की, जरांगे पाटील यांची ईडीमार्फत चौकशी झाली पाहिजे. जरांगे यांच्या मागे मुख्यमंत्री आणि तुतारीवाल्याचा हात आहे. मुख्यमंत्र्यांना कुठलाच अभ्यास नाही त्यामुळे त्यांनी जे जीआर काढले ते कोर्टत टिकतील का? तुतारीच्या पक्षामध्ये मी स्वतः होतो, पवार साहेबांना घरातच सगळे पद लागत असतात. मी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत असताना जाणवलं की, लोकप्रतिनिधींनी कारखान्याहून अंतरवलीत वायर पुरवले. जरांगे यांचे उपोषणा उठल्यानंतर बसवण्याचं काम या लोकप्रतिनिधी आणि रोहित पवार यांनी केल्याचा गंभीर आरोप वाघमारे यांनी केला.

दरम्यान लक्ष्मण हा के यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुख्यमंत्री घटनेशी द्रोह करत आहेत, घटनेची तत्वं पाळत नाहीत. ओबीसीचे बांधव यांना फक्त शाखा प्रमुखांसाठी लागतात. विधानसभेत पाठवण्यासाठी मात्र यांना दारूचे गुत्तेदार दोन नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना आमदार, खासदारकीचे तिकिटे देतात. वरुन हेच सामाजिक न्यायाची भाषा करतात हे विशेष अशी टीका हाके यांनी मुख्यमंत्री शिंदेंवर केली.

जरांगे यांनी खोके घेऊन लोकसभेत उमेदवार निवडून आणले

काल नवनाथ वाघमारे यांनी मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले होते, ते म्हणाले, शरद पवार आणि रोहित पवार यांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही मराठा समाजाच्या आंदोलनात जातात मग ओबीसी आंदोलकांमध्ये का जात नाही. जरांगे यांनी खोके घेऊन मराठा उमेदवारांना लोकसभेमध्ये निवडून आणले, असंही ते म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+