Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"हिंदूंनी ३-४ मुलाना जन्म द्यावा" नवनीत राणांचे वादग्रस्त विधान; मुस्लिम लोकसंख्येवरून दिला हा इशारा

Navneet rana controversy hindus give birth to 4 kids : भाजप नेत्या नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानांनी वादाला तोंड फुटले आहे. "जर मुस्लिम १९ मुलांना जन्म देऊ शकतात, तर हिंदूंनीही किमान ३ ते ४ मुलांना जन्म दिला पाहिजे," असे आवाहन त्यांनी केले आहे. भारताचे रुपांतर पाकिस्तानमध्ये करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.

Navneet rana controvers

नेमकं काय म्हणाल्या नवनीत राणा?

नवनीत राणा म्हणाल्या, "त्यांच्याकडे चार पत्नी असताना जर ते १९-१९ मुले जन्माला घालत असतील, तर मी सर्व हिंदूंना आवाहन करते की, आपणही किमान ३ ते ४ मुलांना जन्म दिला पाहिजे. ते हिंदुस्थानला पाकिस्तान बनवण्याच्या मार्गावर चालले आहेत; त्यामुळे जर आपले आपल्या देशावर प्रेम असेल आणि ते जर १९ मुले पैदा करत असतील, तर आपण ३ ते ४ मुले नक्कीच जन्माला घातली पाहिजेत."

'१५ सेकंदां'च्या विधानाचा पुनरुच्चार

एका धार्मिक नेत्याच्या १९ मुले असल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओचा संदर्भ देत नवनीत राणा म्हणाल्या की, "काही गट उघडपणे आपली लोकसंख्या वाढवून भारताची ओळख बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा परिस्थितीत हिंदूंनी केवळ एका मुलावर समाधान मानू नये. जर समोरून १९ मुले होत असतील, तर आपण किमान ३ ते ४ मुले जन्माला घातली पाहिजेत."

यावेळी त्यांनी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांच्या जुन्या '१५ मिनिटे पोलीस हटवा' या विधानाचाही समाचार घेतला. "त्यांना वाटतं १५ मिनिटे लागतील, पण आम्हाला आमची ताकद दाखवायला फक्त १५ सेकंद पुरेसे आहेत," अशा शब्दात त्यांनी आपला आक्रमक पवित्रा पुन्हा बोलून दाखवला.

Take a Poll

उद्धव ठाकरेंवरही साधला निशाणा

मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात होऊ घातलेल्या संभाव्य युतीवरही त्यांनी बोचरी टीका केली. "उद्धव ठाकरे हे आजच्या घडीला 'हताश' होण्याचे दुसरे नाव बनले आहेत. निवडणुकीत कार्यकर्ते मिळत नसल्याने ते कोणाशीही युती करायला तयार आहेत," असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंच्या राजकीय स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+