Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नवी मुंबई विमानतळ आज उघडले, मग 'जुने' मुंबई एअरपोर्ट बंद होणार की...CSMIA चे नेमके काय होणार?

तब्बल दोन दशकांची प्रतीक्षा संपवून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (NMIA) आज, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात उद्घाटन होत आहे. या ग्रीनफिल्ड प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी १९,६५० कोटी रुपये खर्च आला असून, हे विमानतळ सुरू झाल्यामुळे मुंबई आता लंडन, न्यूयॉर्कसारख्या शहरांच्या पंक्तीत जाऊन बसणार आहे, जिथे प्रवाशांसाठी एकापेक्षा अधिक विमानतळांचे पर्याय उपलब्ध आहेत.

navi mumbai international airport opening csmia future multi airport hub

मुंबई विमानतळाचे (CSMIA) भविष्य काय?

नवी मुंबई विमानतळामुळे जुने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) बंद होणार नाही. उलट, या दोन्ही विमानतळांच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशाची (MMR) वाढती हवाई प्रवासाची मागणी पूर्ण केली जाईल.

जुने मुंबई विमानतळ: क्षमतावाढ आणि आधुनिकीकरण

मुंबईचे जुने विमानतळ सध्या क्षमतेच्या मर्यादा ओलांडून कार्यरत आहे. धावपट्टीची मर्यादा आणि जागेच्या कमतरतेमुळे त्याची प्रवासी हाताळण्याची क्षमता वाढवणे शक्य नव्हते. नवी मुंबई विमानतळ या ताणामुळे थांबलेल्या हवाई प्रवासाच्या वाढीला (Future Growth) सामावून घेईल, सध्याच्या उड्डाणांची संख्या कमी करणार नाही. CSMIA चे संचालन करणारा समूह जुन्या विमानतळाला अधिक सक्षम बनवणार आहे:

  • टर्मिनल १ चे आधुनिकीकरण: CSMIA मधील टर्मिनल १ चे पुनर्विकास आणि विस्तार करण्याची मोठी योजना आहे. या प्रकल्पात टर्मिनलची क्षमता वाढवून ती २० दशलक्ष प्रवासी (MPPA) वार्षिक इतकी केली जाईल. हे टर्मिनल जैव-अनुकूल (biophilic) आणि पर्यावरणाला पूरक (Sustainable) बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
  • टर्मिनल २ चा विस्तार: मुख्य टर्मिनल २ ची क्षमताही ४० दशलक्षाहून ४५ दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढवली जाणार आहे.
  • एकूण क्षमतावाढ: या सर्व बदलांनंतर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाची एकूण क्षमता ६० ते ६५ दशलक्ष प्रवाशांपर्यंत पोहोचेल.

नवी मुंबई विमानतळाची खास वैशिष्ट्ये आणि भविष्यातील स्थान

नवी मुंबई विमानतळ महामुंबईचे भविष्यातील मुख्य हवाई प्रवेशद्वार बनणार आहे.

  • मोठे ग्रीनफिल्ड प्रकल्प: १,१६० हेक्टर जागेवर उभारलेले NMIA हे देशातील सर्वात मोठ्या ग्रीनफिल्ड (नव्या जागेवर शून्य स्तरापासून विकसित केलेले) प्रकल्पांपैकी एक आहे.
  • प्रवासी क्षमता: पहिल्या टप्प्यात दरवर्षी २० दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता असेल. चौथ्या आणि अंतिम टप्प्यात ही क्षमता वाढून ९० दशलक्ष वार्षिक होईल, ज्यामुळे ते मुंबईच्या जुन्या विमानतळापेक्षा मोठे आणि मुख्य केंद्र बनेल.
  • जगात भारी: हे विमानतळ देशातील पहिले 'कार्बन न्यूट्रल ग्रीन एअरपोर्ट' ठरेल. यात सौरऊर्जा, नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.
  • नाव: या विमानतळाला लवकरच लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
  • टेक ऑफ कधी? उद्घाटनानंतर डिसेंबर महिन्यापासून येथून व्यावसायिक उड्डाणे सुरू होण्याची शक्यता आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या आगमनामुळे मुंबई एक 'मल्टि-एअरपोर्ट हब' म्हणून जागतिक नकाशावर आपली ओळख अधिक मजबूत करेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+