Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नागपुरात दंगल का घडली? CM फडणवीसांनी छावाचा उल्लेख करत स्पष्टच सांगितलं; म्हणाले - हा सुनियोजित कट!

Nagpur violence : "नागपूर हिंसाचार आणि दंगल हा सुनियोजित कट आहे." असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. औरंगजेबाची कबर हटविण्याच्या मागणीसाठी 17 मार्च 2025 नागपूरमध्ये हिंसाचार झाला होता. त्या धर्तीवर आता विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात आपले मत व्यक्त केले.

नागपुरात झालेल्या हिंसाचारानंतर आता तिथे कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नागपुरातील अनेक भागात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान, नागपूर हिंसाचाराचे पडसाद मंगळवारी विधान परिषदेत उमटले आहेत.

Nagpur violence Why did the riots happen

नागपूर हिंसाचारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गंभीर म्हणाले की, ही घटना हिंसक आहे आणि दंगल अर्धी नियोजित आहे. ते म्हणाले, "छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरुद्ध लोकांचा रोष निर्माण झाला आहे, तरीही सर्वांनी महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित केली पाहिजे."

काय म्हणाले सीएम देवेंद्र फडणवीस?

नागपूर हिंसाचारावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले की, "ही घटना हिंसक आहे आणि दंगल नियोजित आहे, छावा चित्रपटामुळे औरंगजेबविरुद्ध लोकांचा रोष निर्माण झाला आहे, तरीही सर्वांनी महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित केली पाहिजे."

'छावा' चित्रपटावर मुख्यमंत्र्‍यांचे भाष्य

नागपूर हिंसाचारावर विधानसभेत विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी निवेदन केले. त्यावेळी त्यांनी 'छावा' चित्रपटाचा उल्लेख आपल्या भाषणात केला. ते म्हणाले, "मला कुठल्या चित्रपटावर टीका करायची नाही. आज महाराष्ट्रात 'छावा' या चित्रपटाने संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्यासमोर आणला. पण त्यानंतर राज्यात लोकांच्या भावनाही मोठ्या प्रमाणावर प्रज्वलित झाल्या आहेत. औरंगजेबाबद्दलचा रागही मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहे. पण हे सर्व जरी असले, तरी महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे आहे."

नागपूर हिंसाचारावरुन विरोधकांचा जोरदार हल्ला

महाराष्ट्रातील महायुती सरकारवर विरोधी पक्षांनी जोरदार हल्लाबोल केला. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विधानसभेत विरोधी पक्षांनी जोरदार ताशेरे ओढले आहेत. नागपुरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेबद्दल विरोधी पक्षांनी हे सरकारचे आणि गुप्तचर यंत्रणांचे अपयश असल्याचे म्हटले आहे.

पोलिसांचे हात बांधलेले - विजय वडेट्टीवार

आज विधानसभेत विरोधी पक्षाने नागपूर हिंसाचारावरुन सरकारल धारेवर धरले. काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, औरंगजेबाच्या थडग्याबाबत काल सकाळी ज्या प्रकारे आंदोलन झाले, त्यानंतर संध्याकाळी हिंसाचार झाला, त्यावरून सरकारचे अपयश स्पष्ट होते. पोलिसांचे हात बांधलेले आहेत आणि त्यामुळे त्यांना नीट काम करता येत नाही. सरकारचे काही मंत्री मोठ्याने बोलले त्यामुळे सामाजिक वातावरण तापले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+