Nagpur Temperature Updates : नागपूरसह विदर्भाला उष्णतेचा तडाखा बसणार,एप्रिलमध्ये एवढे वाढणार तापमान!
Nagpur Temperature Updates : राज्यात तापमान हळू हळू वाढत असून मराठवाडा , कोकणात पारा वर चढत आहे. मात्र, विदर्भात सर्वच जिल्ह्यात राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत पारा झपाट्याने वाढत आहे. विदर्भासह संपूर्ण मध्य भारतात एप्रिल आणि मे महिन्यात तीव्र उष्णता जाणवणार आहे. विदर्भातील नागपूरसह अनेक जिल्ह्यात पारा 45 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचू शकत, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
फेब्रुवारीच्या महिन्यातच यंदा उष्णतेच्या झळा बसत होत्या, मार्च आणि एप्रिलमध्ये तापमान कसे राहील याची कल्पना करायला नको असेही काही तज्ज्ञ सांगत आहेत. विशेषतः मार्चपेक्षा एप्रिलमध्ये उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. मात्र, गेल्या आठवड्यात फाही प्रमाणात दिलासा मिळाला होता.

एप्रिलमध्ये उन्हाच्या झळा!
महाराष्ट्रातील बहुतांश भागात हवामान विभागाने तापमानात वाढ होणार हे स्पष्ट केले आहे. दरम्यान, मार्चमध्ये हवामान कोरडे असले तरीही काही ठिकाणी पावसाने तापमानात दिलासा मिळाला आहे, आता मार्चच्या अखेरीस आणि एप्रिलपासून सूर्य अधिक तिव्रतेने आग ओकणार आहे. यंदा उष्णतेचा इशारा नेहमीपेक्षा जास्त दिवस राहील, असा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
उन्हापासून कसे करावे संरक्षण?
- सुती कपडे: सुती कपडे उन्हात हवा खेळती राहते, ज्यामुळे उष्णता कमी जाणवते.
- सनस्क्रीन: सनस्क्रीन त्वचेला हानिकारक UV किरणांपासून वाचवते, त्यामुळे बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा.
- टोपी किंवा छत्री: डोके आणि मान उन्हापासून वाचवण्यासाठी टोपी किंवा छत्रीचा वापर करा.
- कडक उन्हात प्रवास टाळा: शक्य झाल्यास, कडक उन्हात प्रवास टाळा.
- हलके रंग : उन्हाळ्यात हलक्या रंगाचे कपडे घाला, कारण ते उष्णता कमी शोषून घेतात.
- कडक उन्हात गाडीत बसू नका : उन्हात गाडीत बसल्यास गरम होऊ शकते, म्हणून गाडीत बसण्यापूर्वी खिडक्या उघडा.
- कडक उन्हात व्यायाम टाळा : कडक उन्हात व्यायाम केल्यास उष्णतेने आजारी पडण्याची शक्यता असते.
- केसांची काळजी : उन्हात केस कोरडे होऊ शकतात, म्हणून नियमितपणे केस तेल लावा आणि केस कोरडे होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घ्या.
- आहार : उन्हाळ्यात फळभाज्या आणि पाण्याचे प्रमाण वाढवा.
उन्हाळ्यात पाणी किती प्यावे?
उन्हाळ्यात पाणी पीत राहणं गरजेचं आहे. आरोग्य तज्ज्ञ उन्हाळ्यात जास्त प्रमाणात पाणी पिण्याचा सल्ला देतात. आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. काही प्रमाणात पाणी यकृत, फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू, स्नायू आणि हाडे तसेच शरीराच्या इतर अनेक अवयवांमध्ये देखील साठवले जाते, हे त्यांचे कार्य चालवून ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात सातत्याने पाणी पित राहणे हे आरोग्यासाठी देखील अतिशय फायद्याचे असते.
पाणी पिण्याचे फायदे
- पाणी पिल्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
- पाणी पिल्याने वजन कमी होते.
- पाणी शरीराला हायड्रेट ठेवते
- पाणी शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करते
- शरीराला पुरेसे पाणी मिळाल्यास त्वचा ओलसर राहते.
- पाणी प्यायल्याने हाडे मजबूत राहतात












Click it and Unblock the Notifications