रामदेव बाबांच्या फूड पार्कमुळे विदर्भातील शेतकऱ्यांना काय फायदा होणार? 5 मुद्यांत समजून घ्या
Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मिहान, नागपूर येथील आशियातील प्रथम आणि देशातील सर्वात मोठे फूड प्रोसेसिंग यूनिट असलेल्या 'पतंजली फूड व हर्बल पार्क'च्या कोनशिलेचे आज अनावरण केले. यावेळी योग गुरु स्वामी रामदेव बाबा आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण उपस्थित होते.
विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय काही नवा नाही, रोज विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाच आता फूड पार्क विदर्भात येऊ घातला आहे. या फूटपार्कचा विदर्भातील शेतकऱ्यांना फायदा काय? असा प्रश्न पडला असेल तर 5 मुद्यांत जाणून घेऊया.

1. नागपूर येथे पतंजलीचे नवीन फूड पार्क उघडण्यात आले आहे. यामुळे विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
2. संत्र्याला चारपट अधिक भाव मिळणार असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावरणार आहे, अर्थातच ते मालामाल होतील.
3. महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांनाही याचा लाभ होईल. या पार्कमध्ये संत्र्याचे प्रक्रियाकरण आणि निर्यातही केली जाणार आहे.
4. जो संत्रा 3 ते 4 रुपयांनी विकला जातो. तोच संत्रा पतंजलीकडून 18 रुपयांनी खरेदी करणार, तशी घोषणाच पतंजलीने केली.
5. प्रसिद्ध योग गुरू रामदेव बाबा यांच्या फूड पार्कचं आज नागपुरात दणक्यात उद्घाटन करण्यात आलं. या फूड पार्कमुळे विदर्भासह देशातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार आहेत. या फूड पार्कमुळे संत्र्याला चारपटीने अधिक भाव मिळणार आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "हा अतिशय मोठा हर्बल प्लांट आहे. त्यामुळे संत्र्याचे उत्पादन वाढवावे लागेल. बाजारात न विकला जाणारा संत्रा या ठिकाणी विकत घेतला जात असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. इतरही फळांवर येथेच प्रक्रीया होईल. कोल्ड स्टोरेज व्यवस्था केली आहे. नवीन नर्सरी तयार करून चांगल्या पद्धतीचा संत्रा तयार करण्यात येणार आहे."
नितीन गडकरींनी हा सांगितला मोठा फायदा!
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, "मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पतंजलीला मिहानमध्ये मोठ्या प्रकल्पाची सुरुवात करा अशी विनंती केली होती. विदर्भात 10 हजाराहून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. याचे कारण शेतकरी सोयाबीन, कापूस आणि संत्रा पीक घेतात. मात्र योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते, पण आता तसे होणार नाही, जो संत्रा 3 ते 4 रुपयांनी विकला जातो. तोच संत्रा पतंजलीकडून 18 रुपयांनी खरेदी केला जाणार आहे. तशी घोषणाच पतंजलीने केली आहे. त्यामुळे चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळणार आहेत."
Big milestone for Vidarbha !
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 9, 2025
🔸Inauguration of 'Patanjali Food and Herbal Park' at the hands of CM Devendra Fadnavis and Union Minister Nitin Gadkari
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'पतंजली फूड आणि हर्बल पार्क'चे उदघाटन
🔸मुख्यमंत्री… pic.twitter.com/8lvGTp75bh
रामदेव बाबा नागपुरात काय करणार?
- या प्रकल्पाची क्षमता रोजची 800 टनची आहे.
- नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी ज्यूस तयार केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे.
- संत्र्याचे उत्पादन वाढवण्यासाठी चांगल्या पद्धतीचे रोप तयार करण्यासाठी नर्सरी तयार करणार
- अन्य फळांचाही नैसर्गिक पद्धतीने ज्यूस काढण्याचे काम करणार. संत्रा निर्यात करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार.
- विदर्भासह गुजरात, राजस्थान आणि मध्यप्रदेशातूनही संत्रा आयात केला जाणार












Click it and Unblock the Notifications