हाय-हाय ये गर्मी..! उष्णतेबाबत मुंबई देशात चौथे; तापमान सातत्याने ३५ अंशाच्या पुढे, उन्हाळ्यात काय?
उन्हाळा सुरु व्हायला अजून किमान महिनाभर वेळ आहे. मात्र फेब्रुवारीतच मुंबई शहर वाढत्या तापमानामुळे हैरान झाले आहे. मुंबई आणि महानगरातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना अकाली उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. देशाच्या पूर्वेकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांनी सध्या मुंबईचे हवामान बिघडवल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवस मुंबई आणि परिसरात तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. 23 फेब्रुवारी रोजी मुंबई देशातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर ठरले होते. सध्या वातावरणात वायव्येकडून येणाऱ्या थंड वाऱ्याची उपस्थिती नाही, त्यामुळे वेळेआधीच लोकांना उकाडा जाणवत आहे.

मुंबई सातत्याने तापलेले
वातावरणात कोरडे वारे वाहत असल्याने मुंबईचे तापमानात अजूनही वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सांताक्रूझ येथील तापमान सलग तिसऱ्या दिवशी 37 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पालघरचे तापमान 40 अंशांवर गेले असून, ठाण्याचे तापमान 39.4 अंश, खारघरचे 39.2 अंश, पनवेलचे तापमान 38.5 अंश आणि कल्याणचे 38.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याशिवाय चिपळूणमध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबईचे तापमान वाढेल?
साधारणः एप्रिल व मे महिन्यात उष्णतेच्या लाटा येतात. परंतु सध्या समुद्रावर पश्चिमेकडून येणारे दमट वारे नसल्याने उष्णतेची लाट आत्ताच वाढल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबई व उपनगराचे वातावरण गेल्या आठ-दहा दिवसांपासून सातत्याने ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे हे. 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजेच महाशिवरात्रीपर्यंत मुंबईचे तापमान सामान्यपेक्षा चार ते पाच अंश सेल्सिअस जास्त असेल, असाही अंदाज सांगितला जात आहे. त्यामुळे मुंबई, पालघर ठाण्यात अवकाळी उष्णतेची लाट जाणवणार आहे.












Click it and Unblock the Notifications