Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Mumbai Goa highway accident : डिझेल संपले अन् आयुष्यही गमावले! कारला टोईंग वाहनाची धडक, 4 जण ठार

Mumbai Goa highway accident : मुंबई - गोवा महामार्गावर कारला टोईंग वाहनाने धडक दिल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची भीषण घटना वीर रेल्वेस्थानकाजवळ काल मध्यरात्रीनंतर घडला. या अपघातात दोन जण गंभीर झाले आहेत.

मृत आणि जखमींची नावे

सुर्यकांत मोरे, साहिल शेलार वय 25, प्रसाद नातेकर वय 25, समिप मिंडे असे जागीच ठार झालेल्या चौघांची नावे आहेत. तर सुरज नलावडे वय 34, रा. चांभारखिंड, शुभम माटल वय 26, रा. शिरगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Mumbai Goa highway accident

असा घडला अपघात

महाडवरुन मुंबईकडे जाताना वीर रेल्वेस्थानकाजवळ स्काॅर्पिओ गाडीचे डिझेल संपल्याने कार रस्त्यालगत थांबवण्यात आली होती. आतील सहाजण उतरुन कारशेजारी थांबले होते. त्याचवेळी टोईंग वाहन आले अन् कारवर धडकले.

अपघात एवढा भीषण होता की, कार जवळपास चाळीस ते पन्नास मीटर फेकली गेली आणि सर्व्हिस रस्त्यालगतच्या खड्ड्यात फेकली गेली.

कारची दुचाकीला धडक, वहिनी- दिर ठार

पुण्यात येरवडा-विमानतळ रस्त्यावर भरधाव कारने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने वहिनी आणि दिर ठार झाले. या अपघातत दुचाकीस्वार जागीच ठार झाला; तर दुचाकीवरील मृताच्या वहिनीचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी 'एअरफोर्स स्टेशन'जवळ हा अपघात झाला.

मुंबईच्या धारावीत मोठा अपघात, ट्रेलरला धडकून 5-6 वाहने खड्ड्यात पडली.

मुंबई - गोवा हायवेनंतर धारावीत आज पहाटे 4:45 वाजता भीषण अपघात घडला. मुंबईतील टी-जंक्शन परिसरात खाडीच्या काठावर उभ्या असलेल्या 5-6 वाहनांना एका ट्रेलरने धडक दिली, ही वाहने थेड खड्ड्यात जाऊन पडली. या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नसून ट्रेलर चालकाला दुखापत झाली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+