Mumbai Fire : मुंबईत भीषण आग, एकाच कुटुंबातील 5 जणांचा कोळसा! एकूण 7 जणांचा मृत्यू BMC ची माहिती
Mumbai Fire Update : मुंबईतील चेंबूर परिसरात भीषण आग लागल्याने 7 जणांचा होरपळून मृ्त्यू झाला. ही घटना आज सकाळी सिद्धार्थ कॉलनीत घडली. येथे एका दुमजली घराला आग लागली. अग्निशमन दलाचे जवान आगआटोक्यात आणली असून या ठिकाणी कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
काय घडलं नेमकं ?
मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये असलेल्या चाळीतील एका दुमजली घराला पहाटे सव्वा पाचच्या दरम्यान आग लागली. या घराच्या तळमजल्यावर एक दुकान होते. या दुकानाच्या इलेक्ट्रीक वायरिंग आणि सामनाला सुरुवातीला आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. यात तळमजल्यावर दुकान होते आणि वरच्या मजल्यावर एक कुटुंब राहत होते.

यांचा झाला मृत्यू
या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 5 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये 7 वर्षांच्या मुलीचा आणि 10 वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. पॅरिस गुप्ता (7), मंजू प्रेम गुप्ता (30), अनिता प्रेम गुप्ता (39), प्रेम गुप्ता (30), नरेंद्र गुप्ता (10) अशी मृत व्यक्तींचे नावे आहेत. ही आग शॉक सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या पाचजणांसह आणखी दोघांची नावे कळू शकली नाहीत.
#WATCH | Mumbai, Maharashtra | 7 people including 3 children died after a fire broke out at a shop in Chembur around 5 am today: BMC pic.twitter.com/Q87SN0Pgdo
— ANI (@ANI) October 6, 2024
दरम्यान या घटनेची माहिती अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले त्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. यावेळी घरात अडकलेल्या कुटुंबियांना बाहेर काढत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.












Click it and Unblock the Notifications