मुंबई हादरली! दरडीसोबत 5 घरे कोसळली, अंगावर काटा आणणारा VIDEO, पावसाचा कहर..!
Mumbai News Rain Video : मुंबईत पावसाने थैमान घातले असून, अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी संध्याकाळी मुंबईच्या भांडुपमधील खिंडीपाडा भागात एक थरारक घटना घडली.
ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेल्या डोंगरावरून सुमारे 50 फूट उंचीवरून संरक्षक भिंतीसह पाच घरे खाली कोसळली. सुदैवाने, ही घरे आधीच रिकामी करण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरड कोसळल्याचा हा थरारक क्षण काही स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून, त्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भांडुपमधील घटना आणि प्रशासनाची तत्परता
ही घटना घडलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रहिवासी वस्ती आहे. दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
त्यांनी परिसरातील इतर घरेही सुरक्षिततेसाठी रिकामी केली. या दुर्घटनेने भांडुपच्या डोंगराळ भागातील दरडींचा धोका पुन्हा एकदा समोर आणला आहे, ज्यामुळे अशा भागांतील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | A dramatic landslide occurred in Mumbai's Bhandup area on Tuesday, causing several houses and walls on a hillside to collapse within seconds. The incident, triggered by heavy rainfall, left residents in distress. Fortunately, no casualties were reported.… pic.twitter.com/UkUYv4cSQq
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) July 23, 2025
कसारा येथे रेल्वेला भूस्खलनाचा फटका
एकीकडे भांडुपमध्ये दरड कोसळल्याची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे कसारा स्थानकावर मंगळवारी रात्री आलेल्या उपनगरीय रेल्वेच्या डब्यात भूस्खलनाचा ढिगारा घुसला.
मध्य रेल्वेच्या (CR) अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कसारा स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर रात्री ९:१५ वाजता लोकल ट्रेन प्रवेश करत असताना ही घटना घडली. या घटनेत एक पुरुष प्रवासी जखमी झाला. यामुळे पावसाळ्यात रेल्वे वाहतुकीस होणाऱ्या धोक्यांची गंभीर जाणीव पुन्हा एकदा झाली आहे.
मुंबईला मुसळधार पावसाचा 'ऑरेंज अलर्ट'
मुंबई व उपनगरात 22 जुलैच्या रात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देत 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. पुढील 24 ते 36 तासांत 150 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या उशिराने धावत आहेत, तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक सध्या सुरळीत आहे.
हवाई वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवत नसला तरी, प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. मुंबईकरांनी या काळात विशेष काळजी घ्यावी आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.












Click it and Unblock the Notifications