पुणेकरांना कपडे, ब्लॅंकेटची मदत करा, सुप्रिया सुळे यांनी केले आवाहन
पुणे : नुकत्याच झालेल्या पावसाने पुण्याची पुरती दैना उडाली. खडकवासला धरणातून झालेल्या पाण्याच्या विसार्गाने घराघरात पाणी शिरले. अनेकांचे संसार उघड्यावर आले. पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना सोडविण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. आता पुणेकरांवर जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवड्याचे संकट उभे ठाकले आहे. "आपण आपल्या परीने कपडे, ब्लँकेट अशी काहीतरी मदत करूयात", असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

पुण्यात बुधवारी रात्री तुफान पाउस झाला. लवासा परिसरात एका रात्रीत तब्बल 500 मिमी पाउस कोसळला. हा पाउस पुणेकरांसाठी दुःस्वप्न ठरला आहे. पुण्यातील सिंहगड रोडव्रसानार्या अनेक संकुलांत आणि दुकानांत पाणी शिरले. जीवनावश्यक वस्तू पुराच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले आहेत. अनेक इमारतींच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये गाळ साचला आहे. कित्येक गाड्याणा जलसमाधी मिळाली आहे. शेकडो नागरिक हतबल झाले आहेत. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी या भागाचा दौरा केला. आणि नागरिकांना मदतीचे आवाहन केले.
महानगरपालिका आणि जलसंपदा विभागाच्या विसंवादामुळे पुण्यावर संकट
"ही राजकारणाची वेळ नाही. पुणेकर अडचणीत आहेत. राजकारणासाठी खूप वेळ आहे. केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांच्या विसंवादामुळे पुण्यावर संकट कोसळले आहे. असंख्य महिलांच्या डोळ्यात अश्रू आहे. काडी काडी करून गोळा करून उभा केलेला संसार मातीमोल झाला आहे. याला जबाबदार कोण असेल तर महाराष्ट्र सरकार असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला
थोडावेळ राजकारण बाजूला ठेवा
अशा कठीण प्रसंगात राहाकरण बाजूला ठेवण्याच आवाहन सुप्रिया सुळे यांनी केलं. पुराचा फटका बसलेल्या नागरिकांना एका पकेजची घोषणा करावी. पाण्याच्या टाक्या तातडीने साफ कराव्यात. दिवसातून दोनवेळा फवारणी करावी. स्वच्च पाणी आणि विजेची सोय आधी करावी. आणि प्रत्येकाला आर्थिक मदत करावी अशा मागण्या सुप्रिया सुळे यांनी मांडल्या.
पुणेकरांना आवाहन
"माझी पुणेकरांना विनंती आहे, आपल्याला शक्य होईल ती मदत पूरग्रस्तांना करावी. कपडे ब्लँकेट अशा वस्तू पुर बाधितांना द्याव्यात. जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तानीही तसे आवाहन जनतेला करावे. आम्ही ते सुरु केलेल आहे, जनतेने मदत किंवा धान्य आमच्याकडे दिले तर ते आम्ही गरजू पर्यंत पोहोचवू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. शेवटच्या माणसापर्यंत मदत पोहोचविणे ही आमची जबाबदारी आहे. पुढच्या आठ दिवसांत कागदपत्रे बनविण्यासाठी कॅम्प लावला जाईल. असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची काळजी सर्वांनीच घ्यावी असे सांगतानाच हे सरकार पूर्ण अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला.












Click it and Unblock the Notifications