आरक्षणाला धक्का लागला तर मी राजकारणातून संन्यास घेणार, प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान
भंडारा : आरक्षणाला जर धक्का लागेल तर मी शंभर टक्के राजकारणातून संन्यास घेणार. कारण अशावेळी मला कुठल्याही पदावर आणि राजकारणात राहण्याचा कोणताही अर्थ नाही,असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. पटेल यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात आता चर्चाला उधाण आलं आहे.
पुढे बोलताना पटेल म्हणाले की, या देशात आरक्षण, हे संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे. त्या आरक्षणाला कोणीही धक्का लावू शकत नाही. त्याचा मूळ ढाचा कोणीही बदलू शकत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत विनाकारण एवढा अपप्रचार झाला, की लोकं त्याला बळी पडले. पण आता लोकांच्या लक्षात आलं आहे. आणि आमच्यासारखे अनेक लोक जे संसदेत संविधानाची शपथ घेऊन बसलेली आहेत, ते असं कधी ही होऊ देणार नाही. असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते.

मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं
पुढे पटेल यांनी शरद पवार यांचे नाव न घेता निशाणा साधला. प्रफुल्ल पटेल म्हणाले, मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न कालचा, आजचा नाही फार जुना आहे. वर्षानुवर्षी या समाजाकडून आरक्षणाची मागणी होत आलेली आहे. ज्यांच्याकडून मागणी होत आहे त्या समाजाचे नेतृत्व अनेक वेळा महाराष्ट्रात राहिलेले आहेत. अनेक पक्षात राहिलेले आहेत. त्यांनी आजपर्यंत आरक्षण नाही दिलं. पण आज आरक्षणाच्या मुद्द्यावर फक्त टीका करायची. कारण ते स्वतः देऊ शकले नाही. आणि आता चुका काढत बसायचं.
एकच मुद्दा आता निवडणुकीच्या काळामध्ये विरोध करायचा हा एकच मुद्दा बनला आहे. आमचे सरकार ठाम आहे मराठ्यांना आरक्षण मिळालंचं पाहिजे. त्या दृष्टीने विधानसभेत विधेयक पारित झाला, कायदा पण बनला आहे. आणि दहा टक्के आरक्षण दिले आहे. असे पटेल यांनी स्पष्ट केले.












Click it and Unblock the Notifications