'त्या' 107 जणांनी सरकारचं टेन्शन वाढवलं, पाकिस्तानी नागरिकांच्या शोधमोहिमेत धक्कादायक बाबी समोर
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर भारतीय सुरक्षा व्यवस्था सतर्क झाली. गृहमंत्रालयाने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध अद्याप लागलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी शुक्रवारी संवाद साधत आपापल्या राज्यातील पाकिस्तानी नागरिकांना परत पाठविण्याचे आदेश दिले. मात्र आज शनिवारी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे.

भारतात ५ हजार पाकिस्तानी
केंद्रीय गृह मंत्रालयाने मुख्यमंत्र्यांना आदेश दिल्यानंतर प्रत्येक राज्यातील प्रशासन कामाला लागले. प्रत्येक राज्य सरकारने पाकिस्तानी नागरिकांची शोधमोहीम हाती घेतली. यातून समोर आलेली आकडेवारी धक्कादायक होती. राज्यातील ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्य करताना आढळले. यातील केवळ ५१ जणांकडे वैध कागदपत्रे आहेत. शिवाय अजून एक चिंताजनक बातमी म्हणजे पाकिस्तानचे १०७ जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सरकारी यंत्रणांना लागलेला नाही. त्यामुळे १०७ पाकिस्तानी नागरीक नेमके गेले कुठे, ते कोण आहेत, ते सध्या काय करतात, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
नागपूरातील आकडे धक्कादायक
राज्यात जेवढे पाकिस्तानी नागरिक सापडले त्यात सर्वात जास्त पकिस्तानी नागरीक नागपूरात आहेत. राज्यात एकूण ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. यातील जवळपास निम्मे नागरिक उपराजधानी असलेल्या नागपुरात राहतात. त्यांची संख्या २ हजार ४५८ इतकी आहे. ठाण्यातही त्याखालोखाल १ हजार १०६ पाकिस्तानी नागरिक आहेत. पाकिस्तानातून आलेल्या जे १०७ नागरिकांचा बेपत्ता आहेत त्यातील २५ ते ३० जण नागपुरात वास्तव्यास होते, अशी माहिती समोर आली आहे.
१०७ नागरिक सापडेनात
नागपूरातून २५ ते ३० पाकिस्तानी नागरिक कुठे गेले याचा शोध सुरु आहे. शिवाय ठाण्यातील ३३, रायगडमधील ११ जण पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत. जळगावात ३९३, अमरावतीत ११७, नवी मुंबईत २३९, पिंपरी-चिंचवडमध्ये २९० पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे समजले. राज्यातील २०८८ पाकिस्तानी नागरिक मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते हेही यातून समोर आले. १०७ पाकिस्तानी नागरिकांचा ठावठिकाणा लागत नसल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.












Click it and Unblock the Notifications