Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी: 12 दिवसांच्या आधीच महाराष्ट्रात मान्सून दाखल, बळीराजाची चिंता मिटली, या भागांना इशारा

Monsoon Cooming in Maharashtra : शेतकऱ्यांसाठी आनंदाजी बातमी समोर आली आहे. यंदा पीक पेरणी कधी करायची याची चिंता करण्याची शेतकऱ्यांना अजिबात नाही. कारण, बळीराजासाठी आनंदाची बातमी असून मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. विशेष बाब म्हणजे, तब्बल 12 दिवस आधीच मान्सून तळकोकणातील देवगडमध्ये दाखल झाला आहे, अशी माहिती हवामान विभागाने केली आहे.

महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 7 जूनला मान्सून दाखल होतो. मात्र यंदा वेळेच्या आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, मुंबईतही लवकरच मान्सून दाखल होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे.

Monsoon entry in Kokan Maharashtra

मान्सून तळकोकणात दाखल

नैऋत्य मान्सूनने भारतात प्रवेश केला असून केरळ, कर्नाटकचा बहुतांश भाग, संपूर्ण गोवा आणि महाराष्ट्रातील तळकोकण व्यापला आहे. तळकोकणातील देवगडमध्ये मान्सून दाखल झाला असून पुढचे पाच दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणसह प. महाराष्ट्रातही मुसळधारेचा इशारा

हवामान विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे की, पुढील तीन दिवसात मान्सूनसाठी पूरक परिस्थिती असून महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढच्या पाच दिवसांसाठी कोल्हापूर, कोकणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कोकणातील सिंधुदु्र्ग, रत्नागिरी, रायगडचा काही भाग, तर पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली-साताऱ्याच्या काही भागासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

कोकण-गोवा (दक्षिण) जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच दक्षिण मध्यम महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

गोव्यातही मुसळधार पाऊस

एकीकडे महाराष्ट्रात मान्सून दाखल झालेला आहे. तर दुसरीकडे कोकण भागाला लागून असलेल्या गोवा राज्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे गोव्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आले आहे. गोव्याला आज रविवारी काही भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे.

दुसरीकडे, हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला रविवाली यलो अलर्ट दिलेला आहे. तर रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यामुळे तळकोकणात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होताना देखील समोर आलेले आहे.

अन्य समुद्र किनाऱ्यावर शुकशुकाट...

दुसरीकडे किनारपट्टी भागात हवामान विभागाने दिलेल्या चक्री वादळाचा इशाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळ ओस पडली आहेत. मत्स्यव्यवसायावर देखील याचा मोठा फटका बसला आहे. अलिबाग मधील अनेक समुद्र किनारे आज रविवार असून देखील ओस पडले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक संकटात सापडले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+