महाराष्ट्र हातात द्या, फक्त 48 तासांत.... राज ठाकरे पुन्हा कडाडले
यवतमाळ : नुकताच बदलापूरमध्ये लहान मुलीवर अत्याचार झाल्याची तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी ती गोष्ट बाहेर काढली, तेव्हा लोकांना कळली. मात्र ती घटना तोपर्ंयत दाबून ठेवली पण आता एक एक घटना उघड होत आहेत. लहान लहान मुलींवर बलात्कार करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याच्या पाटलाचा हात-पाय कापून चौरंग केला होता, तसे यांचे चौरंग केले पाहिजेत, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला. राज ठाकरे यांचा विदर्भ दौरा सुरु आहे असून ते यवतमाळ वणी येथे बोलत होते.

महाराष्ट्र हातात द्या फक्त 48 तासांत....
राज ठाकरे म्हणाले, कायद्याचा वचक नाही. मी पोलीस यंत्रणेला अजिबात दोष देणार नाही. त्यांच्यावरचा सरकारी दबाव त्यामुळे त्यांना तसं वागाव लागतं. पोलिसांनी काही गोष्टी करायला घेतल्या की त्यांचं निलंबन केलं जातं चौकशी लावली जाते. मी हे गांभीर्यपूर्वक सांगतोय, एकदा हा महाराष्ट्र राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, कायद्याची भिती काय असते ते दाखवून देईन. पुन्हा कुठल्या बाईकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत होणार नाही. फक्त 48 तास दिले, तर मुंबई पोलीस साफ करुन ठेवतील.
राज ठाकरे विदर्भ दौ-यावर
विधानसभेच्या निवडणुका लागल्या आहेत असं वाटतय. दिवाळीनंतर निवडणुका होतील. निवडणुका कधी होतील? काय होतील? याची कल्पना नाही. पण अंदाज आहे. म्हणून मी त्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून उमेदवार चाचपणी दौरा सुरु केला. मराठवाड्याचा दौरा केला. राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळ वणीमध्ये राज ठाकरे यांनी राजू उंबरकर यांची उमेदवारी यावेळी जाहीर केली. यावेळच्या विधानसभा निवडणुकीला मनसे 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे असं राज ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ
एकूणच महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झालं असून राजकारणाचा चिखल झाला आहे. तुम्ही निवडणुकीत या लोकांना मतदान करता, नंतर हे लोक विकले जातात. नंतर कोण कुठल्या पक्षात आहे, ते समजतच नाही. असं वातावरण महाराष्ट्रात कधी पाहिलं नव्हत. तुम्हाला याचा राग येतो की नाही? विधानसभा निवडणुकीत हा तो राग व्यक्त करा, असं राज ठाकरे म्हणाले.












Click it and Unblock the Notifications