मोठी बातमी : मुलाचे अपहरण झाले की आणखी काय..? तानाजी सावंतांनी पत्रकार परिषदेत दिली मोठी माहिती

माजी मंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचे अपहरण झाल्याच्या बातम्यांनी काही तासांपूर्वी खळबळ उडाली होती. मात्र आता या प्रकरणात स्वतः तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत, या सगळ्या प्रकरणाचा खुलासा केलाय.

Tanaji Sawant

नेमके काय होते प्रकऱण?

सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी चार वाजेच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एक फोन आला. त्यांनी तानाजी सावंत यांच्या मुलाला कुणीतरी घेऊन गेल्याचे सांगितले. त्यानंतर तातडीने पोलिस यंत्रणा सतर्क झाली. माहिती घेतली असता तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज हा विमानाने पुण्याला गेल्याचे समजले. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात याप्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असल्याचेही रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले.

उडाली एकच खळबळ

पोलिसांना फोन आल्यानंतर ही बातमी महाराष्ट्रभर पसरली. पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला. तानाजी सावंत यांच्या मुलाचे कुणी व कशासाठी अपहरण केले, ही चर्चा सुरु झाली. मात्र त्यानंतर तातडीने तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणाचा खुलासा केला.

काय म्हणाले सावंत?

ऋषीराज बँकॉककडे खासगी विमानाने निघाला होता. आता रात्री ९ वाजेच्या सुमारास ऋषीराज सावंत पुणे विमानतळावर दाखल झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, तानाजी सावंत यांनी तातडीने या प्रकरणात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, माझा मुलगा ऋषीराज हा पुण्यावरुन विमानाने गेला आहे. त्याबाबत सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परंतु तो बेपत्ता झालेला नाही किंवा त्याचे अपहरण झालेले नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्र आहेत. माझ्या घरातील पद्धत अशी की कोणी कुठेही गेले तरी एकमेकांना सांगून जाते. ऋषीराज मला सांगितल्याशिवाय कुठे जात नाही. परंतु तो दुपारपासून घरात नसल्याने व त्याने कुणालाही काहीच न सांगितल्याने चिंता वाढली होती. तो दुसऱ्याच्या गाडीने गेल्याने व कुणालाही फोनसुद्धा न केल्याने आम्ही गडबडलो होतो. आम्ही चिंताग्रस्त झाल्यामुळे पोलिसांना कळवले आणि तपास सुरु झाला आहे, असे सावंत यांनी स्पष्ट केले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+