देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी निदर्शनासाठी जाणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक ताब्यात
देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाकडे निदर्शनासाठी जाणाऱ्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आंदोलकांना आज दुपारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सातत्याने उपोषण करत आहेत तसेच अनेक वेळा आंदोलने देखील केलेले आहेत, मात्र अद्याप पर्यंत मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक रमेश केरे पाटील हे राजकीय नेत्यांच्या घरासमोर 'जवाब दो' आंदोलन करत आहेत.
आंदोलनापूर्वीच पोलिसांनी घेतले ताब्यात
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर आंदोलन केले होते.त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानाबाहेर देखील आंदोलन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती ठोक मोर्चा चे समन्वयक रमेश केरे पाटील यांच्यासह मराठा आंदोलक आज सहा ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्र आले होते.

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. हे सर्व मराठा बांधव देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे जात असताना मराठा आंदोलकांना गिरगाव चौपाटी जवळ थांबवण्यात आले. तसेच रमेश केरे पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मराठा आंदोलन मुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे.
मराठा समाजाला फक्त झुलवतात
देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याशिवाय आम्ही आंदोलनातून माघार घेणार नाही असे रमेश केरे पाटील यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबाबत भाजपची भूमिका काय आहे ती स्पष्ट करावी यासाठी आम्ही जवाब दो आंदोलन आयोजित केल आहे.
सगळे राजकीय पक्ष फक्त मराठा समाजाला झूलवण्याचे काम करत आहेत पण ठोस भूमिका कोणीही घेत नाही असेही रमेश केरे पाटील म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी ही मराठा आंदोलन आंदोलन करणार आहोत, असेही केरे पाटील यांनी सांगितले.
फडणवीसांनी भूमिका स्पष्ट घ्यावी
केंद्रात आणि राज्यांमध्ये देखील भाजपची सत्ता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत असे केले पाटील म्हणाले आहेत. फडणवीस यांनी आरक्षणासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले आहे मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार आहे, असेही केरे पाटील यांनी सांगितले. तसेच भाजपची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका काय आहे? हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट करावे, असेही केले पाटील म्हणाले.












Click it and Unblock the Notifications