मनोज जरांगेनी उपोषण सोडलं पण देवेंद्र फडणवीसांना इशारा, म्हणाले- ज्यांनी त्रास दिला त्यांना...
Manoj Jarange's hunger strike ends : अंतरवाली सराटी इथं गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे यांचं सुरु असलेले उपोषण आज नवव्या दिवसी सोडलं! नारायण गडाच्या महंतांच्या हस्ते हे उपोषण सोडण्यात आलं आहे. यावेळी मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हाताने तुमची सत्ता पाडू नका असा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषण सोडताना सरकारला इशारा दिला आहे, जर आरक्षण दिलं नाही आणि सर्व मागण्या मान्य न केल्यास पाडापाडी कशामुळे झाली हे तुम्ही मला म्हणू नका. मराठा समाजाला मोठं करण्याची तुम्हाला संधी आहे असं त्यांनी सरकारला उद्देशून म्हटलं. तर नेत्याला आणि त्यांच्या मुलांना मोठं करण्याची मराठा समाजाने मतदानाची संधी घालवू नये असं समाजाला उद्देशून म्हटलं आहे.

अंतरवालीत नवव्या दिवशी मनोज जरांगे यांंचं आंदोलन स्थगित झालं असून आता ते उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे जाणार आहेत. न्यायालयानंही त्यांना उपचार घेण्याचं सांगितलं होतं. तसेच मराठा समाजबांधवांचाही उपोषण सोडण्याचा आग्रह होता. या धर्तीवर आज नारायण गडाच्या महंताच्या उपस्थितीत त्यांनी आपलं उपोषण सोडलं.
काय म्हणाले मनोज जरांगे?
उपोषण करायचे नाही असे अनेकजण मला म्हणत होते. मायमाऊलींनी मला खूप आग्रह केला उपोषण सोडण्यासाठी त्यामुळे आपण आता उपोषण सोडण्याचा निर्णय घेत आहोत. मी मायमाऊलींच्या इच्छेची कदर करतो, कोर्टाने मला उपचार घ्यावे असे सांगितले आहे असंही ते म्हणाले. सलाईन घेऊन उपोषण करण्यात मजा नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं.
ज्यांनी त्रास दिला त्यांना नीट करणार
ज्यांनी- ज्यांनी मराठ्यांना त्रास दिला त्यांचा शेवट मराठेच करणार असं वक्तव्य यावेळी मनोज जरांगे यांनी केलं. मोठी सामाजिक टीम तयार करण्याची गरज आहे असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना इशारा
देवेंद्र फडणवीस यांना इशारा देताना त्यांनी सांगितलं की, देवेंद्र फडणवीस तुम्ही तुमच्या हाताने सत्ता पाडू नका. आरक्षण न दिल्यास सत्तेत बसून आरक्षण घेऊ असं आव्हानही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे.












Click it and Unblock the Notifications